Maharashtra Drought 2026: दुष्काळ जाहीर, आता मदत कधी? पंचनामा ते GPS सर्वेक्षण; GR मध्ये सगळं स्पष्ट

Maharashtra Drought Relief GR Explains : दुष्काळ जाहीर झाल्यानंतर 265 तालुक्यांमध्ये पंचनामे आणि पीक नुकसानीचे सर्वेक्षण सुरू होणार असून, त्यानंतर मदतीबाबत पुढील निर्णय होणार आहे.
Maharashtra has revised drought assessment criteria
Maharashtra has revised drought assessment criteriaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Drought Compensation Maharashtra : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता शेतकऱ्यांचे लक्ष सरकारकडून मिळणाऱ्या प्रत्यक्ष मदतीकडे लागले आहे. दुष्काळाची घोषणा झाली असली, तरी शेतकऱ्यांच्या हातात आर्थिक मदत कधी पडणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. राज्य सरकारच्या GR मध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतरची पुढील प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे.

दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये सर्वप्रथम पंचनाम्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित जिल्हा प्रशासनाला आता पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी आणि सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी लागणार आहे.

विशेष म्हणजे, केवळ पंचनामा करून प्रक्रिया थांबणार नाही. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची सद्यस्थिती दर्शविणारे छायाचित्र आणि GPS coordinates संकलित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या माध्यमातून संबंधित भागातील पीक परिस्थितीची प्रत्यक्ष आणि भौगोलिक माहिती शासनाकडे उपलब्ध होणार आहे.

संकलित करण्यात आलेली ही माहिती आणि अहवाल कृषी आयुक्तांमार्फत राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळण्यापूर्वी पंचनामा, सर्वेक्षण, छायाचित्रे आणि GPS आधारित माहिती संकलन अशी प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

Maharashtra has revised drought assessment criteria
Maharashtra Drought 2026: राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर; 75 टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत

आता खरी उत्सुकता आहे ती पंचनामे नेमके कधी पूर्ण होणार आणि मदतीचा मार्ग खुला झाला असला, तरी प्रत्यक्ष आर्थिक मदतीसाठी पुढील प्रशासकीय प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

265 तालुक्यांमध्ये Trigger-1 लागू झाल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या तालुक्यांतील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. मात्र, मदतीची नेमकी रक्कम, पात्रता आणि वितरणाची तारीख याबाबतचा स्वतंत्र निर्णय होणे आवश्यक आहे.

सरकारच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्याची कार्यवाही तातडीने सुरू केल्यास पुढील प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंचनामे कधी पूर्ण होतात, पीक नुकसानीचा अहवाल शासनाकडे कधी पोहोचतो आणि त्यानंतर मदतीचा निर्णय कधी होतो, याकडे राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra has revised drought assessment criteria
Mission Mahagram: गावांच्या विकासाला 10 लाखांचा ‘बूस्टर’; कोणत्या गावांना मिळणार निधी? जाणून घ्या निकष

दुष्काळ जाहीर झाला, आता पंचनामे हा पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे. पंचनामे आणि सर्वेक्षणाचा अहवाल शासनाकडे गेल्यानंतर पीक नुकसानीच्या मदतीबाबत पुढील निर्णय होणार आहे. त्यामुळे ‘मदत कधी मिळणार?’ या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे पुढील उत्तर आता पंचनाम्याच्या प्रक्रियेतून स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com