Ladki Bahin Yojana : सरकारचा धडाकेबाज निर्णय! e-KYC ची अंतिम मुदत थेट डिसेंबर 2025 पर्यंत वाढली, मंत्री आदिती तटकरेंचीही मोठी घोषणा

Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana e-KYC Deadline Extended : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्यासाठीची अंतिम मुदत मंगळवारी (ता. 18) संपत आहे. अशातच सरकार ई-केवायसीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
 Aditi Tatkare
Aditi TatkareSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील अनेक पात्र महिलांना नैसर्गिक आपत्तीमुळे e-KYC करता न आल्याने राज्य सरकारने अंतिम मुदत वाढवली आहे.

  2. नवीन अंतिम तारीख सरकाकडून जाहीर करण्यात आली असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

  3. या निर्णयामुळे लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार असून योजना लाभ घेणे आता अधिक सुलभ होणार आहे.

Raigad News : राज्य सरकारच्या सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या ई-केवायसीत अनेक अडचणी आल्या होत्या. ज्यामुळे लाखो महिला या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच योजनेच्या ई-केवायसीची अंतिम मुदतही मंगळवारी (ता.18 नोव्हेंबर) रोजी संपत आल्याने राज्यातील महिलांमध्ये नाराजी पसरली होती. पण आता महायुती सरकारने ई-केवायसीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत करण्यात आली आहे. यामुळे लाखो लाडक्या बहिणींना आता थेट फायदा होणार आहे.

राज्य सरकारच्या सर्वात यशस्वी अशा 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'त मोठा घोळ समोर आला होता. या योजनेत सरकारी कर्मचारी, पुरूष लाभार्थ्यींचा भरणा झाला होता. ज्यानंतर या योजनेसाठी ई-केवायसी करणे बंधन कारक करण्यात आले होते. त्यासाठी अंतिम मुदत 18 नोव्हेंबरची देण्यात आली होती.

पण सर्व्हर डाऊनसह आधार आणि मोबाईल नंबर लिंक नसण्यासह विविध कारणांमुळे 1 कोटी 10 लाख महिलांची ई-केवायसी झाली नव्हती. तसेच पती किंवा वडील हयात नसलेल्या महिलांना यात अडचण येत होती. यामुळे नुकताच वेबसाईटमध्ये बदल करण्याचे काम हाती घेण्यात येईल अशी घोषणा राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी केली होती. पण आता ई-केवायसीची मुदतच मंगळवारी संपणार असल्याने लाखो महिला चिंतेत होत्या.

 Aditi Tatkare
Ladki Bahin Yojana : बहिणींनो 'E-kyc'ची चिंता मिटणार; 1 कोटी महिलांना फायदा! निवडणुका होईपर्यंतची डेडलाईन?

दरम्यान आदिती तटकरे यांनी या योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा करत ती 1 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. तसेच याबाबत सरकारने निर्णय घेतल्याचे म्हटलं आहे. आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई केवायसी मुदतवाढ देण्यात आली असून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे.

पण याआधीच ई केवायसी प्रक्रिया करण्याबाबत सूचना देताना याची मुदत 18 नोव्हेंबर 2025 असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, गेल्या काही दिवसांत आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आलेली नाही. याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या e-KYC करण्याची अंतिम मुदत आता वाढवून ती 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे. त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे e-kyc करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी.

या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे. ज्या भगिनींनी अद्याप e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असेही आवाहन आदिती तटकरे यांनी यावेळी केले आहे.

 Aditi Tatkare
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! पती किंवा वडील नसलेल्या महिलांनाही मिळणार मोठा फायदा, वाचा प्रोसेस

FAQs :

1. ‘माझी लाडकी बहीण’ योजनेची e-KYC अंतिम तारीख कितीपर्यंत वाढवण्यात आली आहे?
३१ डिसेंबर २०२५ पर्यंत.

2. ही तारीख वाढवण्यामागचे कारण काय?
नैसर्गिक आपत्ती, अडचणी आणि अनेक महिलांना वेळेत e-KYC करता न आल्यामुळे.

3. ही योजना कोणासाठी आहे?
महाराष्ट्रातील पात्र महिलांसाठी सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी योजना.

4. e-KYC कुठे करावी लागते?
CSC केंद्र, अधिकृत सेवा केंद्रे किंवा ऑनलाइन प्रक्रियेद्वारे.

5. अंतिम तारीख वाढल्याने लाभ मिळण्यात उशीर होणार का?
नाही, e-KYC पूर्ण केल्यानंतर नियमितप्रमाणे लाभ मिळत राहतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com