Congress Political Rift : नगराध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये धुसफूस अन् खडाजंगी? नगराध्यक्ष पदासाठी 3 तर नगरसेवकांसाठी 33 इच्छुक

Upcoming Chiplun Municipal Elections : आगामी नगरपालिका निवडणूकीपुर्वीच काँग्रेस पक्षांतर्गत दोन मतप्रवाह निर्माण झाले असून धुसफूस उघड झाल्याचे समोर आले आहे.
Congress
Congresssarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. काँग्रेसच्या आढावा बैठकीत नगराध्यक्ष पदासाठी तिघांनी इच्छा व्यक्त केली आहे.

  2. या बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद उफाळल्याने खडाजंगी झाली असून दोन मतप्रवाह निर्माण झाले.

  3. निवडणुकीपूर्वीच पक्षांतर्गत धुसफूस झाल्याने जिल्हाध्यक्ष यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Chiplun News : आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीत खटके उघड असतानाच आता काँग्रेसमध्ये मतभेद उफाळून चव्हाट्यावर आले आहेत. यामुळे निवडणूकीपुर्वीच काँग्रेसला पक्षांतर्गत संघर्षाला तोंड द्यावे लागणार असून जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे. चिपळूणमध्ये झालेल्या काँग्रेसच्या आढावा बैठकीतच नगराध्यक्ष पदावरून दोन मतप्रवाह पहायला मिळाले. तर यावेळी पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. याची आता जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष उत्तर विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक शहरातील धवल प्लाझाच्या सभागृहात झाली. या वेळी राज्य काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष रामचंद्र दळवी, सरचिटणीस शशांक बावचकर, श्रद्धा ठाकूर, जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष नुरूद्दीन सय्यद, माजी नगरसेवक सुरेश राऊत, अॅड. जीवन रेळेकर, माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष, युवक जिल्हाध्यक्ष, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष, महिला तालुकाध्यक्षा, विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीच्या सुरवातीलाच नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांवरून चर्चा झाली. या वेळी तालुकाध्यक्ष लियाकत शाह आणि अॅड. जीवन रेळेकर यांच्या समर्थकांमध्ये चढाओढ सुरू होती. दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांनी पक्षासाठी कोण किती योगदान देतो, इथपर्यंत हा विषय ताणला. हा विषय अधिक ताणला जाऊ नये यासाठी उपस्थित निरीक्षकांनी पक्षस्तरावर निर्णय घेऊन नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवार अधिकृतपणे घोषित केला जाईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर नगरसेवकपदाच्या 28 जागांसाठी 33 इच्छुकांचे अर्ज आल्याचे समोर आले.काही प्रभागांमध्ये दोन ते तीन उमेदवारांनी अर्ज केल्यामुळे अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे.

Congress
Congress Vs Shivsena UBT : प्रणिती शिंदेंच्या दारात गेला तर पक्षातून हाकलेन : ठाकरेंच्या नेत्याचा सज्जड दम; सोलापूरात वाद टोकाला

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळला. त्या वेळी काँग्रेसने उद्धव सेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला साथ दिली. आता नगरपालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांनी काँग्रेसला साथ देणे आवश्यक आहे. महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षपद सन्मानपूर्वक न मिळाल्यास स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी या बैठकीत कार्यकर्त्यांनी दर्शवली.

दरम्यान, उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुका प्रभावीपणे लढवण्यासाठी आवश्यक रणनीती, कार्यपद्धती व जनसंपर्क मोहीम यावर चर्चा केली. काँग्रेसपक्षाची विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या.

तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आतापासूनच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न समजावून घेऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी केले आहे.

Congress
Congress News : काँग्रेसमध्ये काहीतरी घडतंय...बिघडतंय; प्रदेशाध्यक्ष सपकाळ तातडीने पोचले नितीन राऊतांच्या भेटीला, चर्चांना उधाण!

FAQs :

1. ही बैठक कशासाठी झाली होती?
आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आली होती.

2. नगराध्यक्ष पदासाठी किती जणांनी इच्छा व्यक्त केली?
एकूण तीन नेत्यांनी नगराध्यक्ष पदासाठी इच्छा व्यक्त केली आहे.

3. या बैठकीत वाद का झाला?
नगराध्यक्षपदासाठी कोणाला पुढे करायचे या मुद्द्यावरून दोन मतप्रवाह निर्माण झाल्याने वाद झाला.

4. जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांची भूमिका काय आहे?
त्या पक्षात एकता राखण्याचा प्रयत्न करत असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

5. निवडणूक कोणत्या पक्षांमध्ये होण्याची शक्यता आहे?
महायुती व महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये थेट स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com