Congress Vs Shivsena UBT : प्रणिती शिंदेंच्या दारात गेला तर पक्षातून हाकलेन : ठाकरेंच्या नेत्याचा सज्जड दम; सोलापूरात वाद टोकाला

Congress Vs Shivsena UBT : सोलापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस यांच्यात वाद निर्माण झाला आहे. चंद्रकांत खैरे यांनी प्रणित शिंदे यांच्याकडे मदत मागणाऱ्यांना पक्षातून काढून टाकण्याचा इशारा दिला आहे.
Chandrakanth Khaire warns party workers in Solapur against seeking help from Congress MP Praniti Shinde.
Chandrakanth Khaire warns party workers in Solapur against seeking help from Congress MP Praniti Shinde.Sarkarnama
Published on
Updated on

Congress Vs Shivsena UBT : प्रणिती शिंदे यांना आम्ही लोकसभेला खूप मदत केली. पण विधानसभेला त्यांनी त्याची जाणीव ठेवली नाही. निवडून आल्यानंतरही त्‍या मातोश्रीवर गेल्या नाहीत. त्या आपल्या उद्धव ठाकरे साहेबांचाच जर मान ठेवत नसतील तर कसे सहन करणार? सोलापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही नेते परस्‍पर काँग्रेसवाल्यांशी बोलतात, पण तसे करू नका. प्रणिती शिंदे यांच्या दारात जाऊच नका. कोणी गेलेच तर पक्षातून काढून टाकेन, असा सज्जड दम शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संघटक आणि उपनेते चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.

सोलापूरमधील शिवसेना ठाकरे पक्षाच्या शहर उत्तर-मध्य विधानसभा आढावा बैठकीत सोमवारी मोठा 'राडा' झाला. संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्यावर 'गद्दारांवर कारवाई कधी करणार' असा थेट जाब विचारत संतप्त शिवसैनिक धावून गेल्याने एकच खळबळ उडाली. या राड्यानंतर मंगळवारी सकाळी खैरे यांनी ‘सकाळ’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. पक्षांतर्गत बंडाळीसह विविध विषयावर त्यांनी मोकळपणाने भाष्य केले. यावेळी त्यांच्या समवेत पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, पदाधिकारी दत्ता माने आदी उपस्थित होते.

बरडे, दासरी दोघांनाही झापले :

सोलापुरात पक्षातील काही मातब्बर लोक पक्षात कोणाला येऊच देत नाहीत. पुरुषोत्तम बरडे, अजय दासरी ही प्रस्थापित मंडळी आपसात भांडून नव्या लोकांना संधी देत नाहीत. संघटक नात्याने मी दोघांनाही झापले. सोलापूरचे राजकीय भांडण मातोश्रीवर मांडणारच आहे. ज्या पद्धतीने पक्षातील प्रस्थापित लोक भांडत आहेत त्यातून नव्या कार्यकर्त्यांना काय संधी मिळणार हा खरा प्रश्न आहे. सोलापूरचा चव्हाट्यावर आलेला वाद मातोश्रीवर मी स्वतःच उद्धव यांच्यासमोर मांडणार आहे, असेही खैरे यांनी सांगितले.

Chandrakanth Khaire warns party workers in Solapur against seeking help from Congress MP Praniti Shinde.
Solapur Politic's : सोलापुरातील दोन माजी आमदारांसह 28 जणांचा आज भाजपप्रवेश; मोहोळमधून 367 वाहनांतून दीड हजार कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

एमआयएम भाजपची बी टीम :

सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसने एमआयएम पक्षाला सोबत घेण्याची तयारी केल्याच्या मुद्द्यावर चंद्रकांत खैरे म्हणाले, आम्ही हिंदुत्वनिष्ठ आहोत, मग एमआयएमबरोबर कशाला जायचं? काँग्रेस जर एमआयएमसोबत जाणार असेल तर आम्ही जिल्ह्यात कोणत्याही स्थितीत काँग्रेसला सोबत घेऊन लढणार नाही. एमआयएम ही भाजपाची बी टीम आहे, असे खैरे यांनी ठासून सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com