Konkan politics : वैभव नाईकांच्या लढ्याला मोठे यश; विकास कामांवरील स्थगिती कोर्टाने उठवली

Vaibhav Naik News : मालवण-कुडाळ मतदार संघातील साडेपंधरा कोटी रुपयांची कामे चालू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
MLA Vaibhav Naik
MLA Vaibhav NaikSarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg News : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या न्यायालयीन लढ्याला मोठे यश आले आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या विकास कामांना शिवसेना (शिंदे गट)-भाजप युती सरकारने स्थगिती दिली होती. त्याविरोधात आमदार नाईक न्यायालयात गेले होते. त्यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. मालवण-कुडाळ मतदार संघातील साडेपंधरा कोटींच्या कामांवरील स्थगिती कोर्टाने उठवली आहे, त्यामुळे मालवण आणि कुडाळमधील विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. (Court lifted stay on development works in MLA Vaibhav Naik's constituency)

आमदार वैभव नाईक यांनी स्वतः ही माहिती दिली अहे. मालवण आणि कुडाळ तालुक्यातील विकास कामांना महाविकास आघाडी सरकारने मंजुरी दिली होती. पण, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर युती सरकारने मागील सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांना स्थगिती दिली होती. त्यामुळे मालवण तालुक्यातील ८ कोटी ५४ लाख ५५ हजार रुपये निधीच्या ५२ रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. कुडाळ तालुक्यातील सहा कोटी 95 लाख 45 हजार रुपयांच्या विकास कामांचा समावेश आहे. यामध्ये 35 रस्त्यांचा समावेश आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Vaibhav Naik
Priyanka Gandhi ED Case : मनी लाँड्रींग प्रकरणी प्रियांका गांधी अडचणीत; ED च्या आरोपपत्रात पहिल्यांदाच नाव..

राज्यात दीड वर्षांपूर्वी राजकीय भूकंप झाला आणि शिवसेनेतील मोठा गट हा भाजपबरोबर सत्तेमध्ये सहभागी झाला. मात्र कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कायम राहिले. त्यामुळे नव्या सरकारने मंजूर विकासकामांना स्थगिती देण्यात आली होती. या विरोधात नाईक यांनी न्यायालयात अनेक याचिका दाखल केल्या होत्या.

दरम्यान, शिंदे गटात सामील होण्यासाठी आपल्याला ५० खोक्यांची ऑफर असतानाही आपण शिवसेना ठाकरे गटाशी गद्दारी केली नाही. शिवसेनेशी निष्ठावंत राहिलो, त्यामुळेच आपल्या मतदारसंघातील मंजूर असलेल्या सर्व कामांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती असा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला होता.

ही विकास कामांची स्थगिती उठवण्यासाठी मुख्यमंत्री व पालकमंत्री यांची भेट घेतली होती, पण ही स्थगिती कायम होती. आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा सुरू ठेवला. या स्थगितीविरोधा पक्षामार्फत आमदार वैभव नाईक यांनी कोर्टात याचिका दाखल केली. ही याचिका दाखल करून न्यायालयाने ही स्थगिती उठवण्याच्या आदेश दिल्यानंतर राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी विकास कामांवरील स्थगिती उठविण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र (ॲफिडेव्हिट) न्यायालयात सादर केले, अशी माहिती आमदार नाईक यांनी दिली.

MLA Vaibhav Naik
Captain Vijaykanth : राजकारणातील ‘कॅप्टन’ला कोरोनाने हरवलं; विजयकांत यांचं निधन

न्यायालयाने याचिकेची दखल घेऊन शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय रद्दबातल ठरवत सर्व विकास कामांवरील स्थगिती उठविली. त्याबाबतचे परिपत्रक राज्याच्या मुख्य सचिव कार्यालयाकडून काढण्यात आले आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. तसे पत्रक आणि स्थगिती उठविण्यात आलेल्या मतदार संघातील विकासकामांची यादीही आमदार वैभव नाईक यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे.

Edited By- Vijay Dudhale

MLA Vaibhav Naik
Sunil Kedar News : तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेल्या सुनील केदारांचे पोस्टर झळकले; काँग्रेस महारॅलीत कट्टर समर्थकांचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com