Shaktipeeth Highway : केसरकरांचे शक्तिपीठ महामार्गाला समर्थन? भाजप व शिवसेना शिंदे गटात वादाची ठिणगी; बांद्यात तीव्र विरोध

Deepak Kesarkar, Shaktipeeth Highway And Mahayuti : राज्यातील प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला विरोध वाढतच असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही शेतकरी रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहेत.
Shaktipeeth Highway, Deepak Kesarkar And CM devendra fadnavis
Shaktipeeth Highway, Deepak Kesarkar And CM devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg News : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काही ड्रिम प्रोजेक्ट पैकी नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग हा देखील एक आहे. पण आता या प्रस्तावित महामार्गाला राज्यभर विरोध होताना दिसत आहे. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात या मार्गाला विरोध वाढला असतानाच आता शेजारी असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही विरोध सुरू झाला आहे. तर विरोध शिवसेना नेते माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीतच वादाची ठिणगी पडली आहे.

प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्याविरोधात राज्यात आंदोलन तीव्र केलं जाणार आहे. याबाबत नुकताच कोल्हापूर येथे शेतकऱ्यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वात विरोधाचा निर्धार केला आहे. याबाबत राज्यभरातील प्रमुख लोकांशी ऑनलाईन बैठक बुधवारी घेतली जाणार आहे. यानंतरच महामार्गाच्याविरोधातील आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे.

दरम्यान शक्‍तिपीठ महामार्गाला होणारा विरोध म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला विरोध करण्याचे असल्याचे वक्तव्य दीपक केसरकर यांनी केल्याने याचे तीव्र पडसाद आता जिल्ह्यात उमटू लागले आहेत. केसरकर यांनी, जिल्ह्यात हिरवळ जपली पाहिजे. पण आपल्या येतील हापूस नागपूर आणि दिल्लीपर्यंत पोहोचवायचा असेल तर शक्‍तिपीठ महामार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. तो पुढे रेडी बंदराला जोडला गेल्यास जिल्ह्याला मोठा विकास होईल असा दावा त्यांनी केलाय.

Shaktipeeth Highway, Deepak Kesarkar And CM devendra fadnavis
Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’साठी सरकारचा रेटा; सांगली-सावंतवाडीत कोणत्याही क्षणी जमीन मोजणी!

पण फक्त विरोधाला विरोध करणे योग्य नसून जिल्ह्याने 60 टक्क्यांहून अधिक जंगले जपली आहेत. यात आपल्या पूर्वजांचे काम मोठं आहे. पण आता जंगले नष्ट होत आहेत म्हणून विकास थांबवायचा का? लोकांनी उपाशी मरायचे का? याचा विचार आता आपल्याला करायला हवा. नागपूरात वाघ आणि येथे काळा बिबट्या पाहायला मिळतो. येथे समुद्रही आहे. त्यामुळेच शक्‍तिपीठाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. पण जर जनतेच्या हिताच्या आड येत असेल ते योग्य नाही, असाही दम त्यांनी भरला आहे.

दरम्यान त्यांच्या या वक्तव्य आणि शक्तिपीठ महामार्गाला दिलेल्या पाठिंब्यानंतर माहायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. तर बांदा शहरातून जाणाऱ्या प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला विशेष ग्रामसभेत एकमुखाने विरोध करण्यात आला आहे. यावेळी महामार्ग विरोधी कृती समितीची स्थापनाही करण्यात आली असून अध्यक्षपदी सरपंच प्रियांका नाईक यांची निवड करण्यात आली. यावेळी उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर यांनी, हा महामार्ग शहरातून न नेता पर्यायी मार्गाने स्थानिकांना विश्वासात घेऊन न्यावा अशी मागणी केली. या महामार्गला आमचा विरोध नसून स्थानिक शेतकरी यामुळे विस्थापित होणार असतील तर आम्ही संघर्ष करू असेही त्यांनी म्हटलं आहे.

Shaktipeeth Highway, Deepak Kesarkar And CM devendra fadnavis
Shaktipeeth Highway : शक्तिपीठासाठी 'रात्रीचा खेळ चाले', मनसेचा हल्लाबोल; विरोध करण्याचा निर्धार

केसरकरांचे 'ते' वैयक्तिक मत

स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी शक्तिपीठ महामार्गाला समर्थन दिल्याने हा मुद्दा गजानन गायतोंडे यांनी ग्रामसभेत उपस्थित केला. यावेळी भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्यात वादाची ठिणगी पडली. यावेळी आमदार केसरकर यांचे ते वैयक्तिक मत असून आमची भूमिका ही पूर्णपणे गावातील बाधित शेतकऱ्यांसोबत राहील, असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com