

DGCA कडून सिंधुदुर्ग चिपी परुळे विमानतळाला IFR लायसन्स व ऑपरेशन मंजुरी मिळाली आहे.
या मंजुरीमुळे आता 24 तास विमानसेवा आणि नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे.
विमानतळावरील पार्किंग क्षमता दुप्पट करण्यात आल्याने प्रवासी व विमान वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे.
Sindhudurg airport improves connectivity for Konkan tourism : तळकोकणातील एकमेव असणाऱ्या विमानतळामुळे कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने या विमानतळाबाबत आणखीन महत्वाचा निर्णय घेतला असून नाईट लँडिंगसाठी परवानगी देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे या विमानतळावरील तांत्रिक अडथळ्यांचा निपटारा होण्यास मदत मिळणार असून या विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या मार्गी लागणार आहेत. तर या विमान तळावरून २४ तास विमानसेवा सुरू होणार आहे.
मोठा गाजावाजा करून सिंधुदुर्गातील चिपी परुळे येथील ‘आयआरबी’ विमानतळ सुरू करण्यात आले होते. मात्र तांत्रिक गोष्टींमुळे या विमानतळाच्या विस्ताराला मर्यादा आल्या होत्या. मात्र नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) सिंधुदुर्ग विमानतळाला ऑल वेदर ऑपरेशन्स श्रेणीत मंजुरी दिली नव्हती.
ज्यात नाईट लँडिंगची सुविधेचा समावेश असून त्याचा मोठा परिणाम दिसत होता. यासाठी दीर्घकाळ प्रयत्न सुरू होते. आता DGCA कडून या विमानतळाला IFR लायसन्स आणि ऑपरेशन मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता येथे 24 तास विमानसेवा उपलब्ध राहणार असून नाईट लँडिंगही शक्य होणार आहे. याचबरोबर विमानतळावरील पार्किंग क्षमताही दुप्पट करण्यात आली आहे.
दरम्यान या डिसेंबरमध्ये पहिल्यांदाच विमानतळाने जवळपास ११ हजार प्रवाशांची वर्दळ नोंदवली आणि आता मासिक प्रवासी संख्येनुसार ते भारतातील महत्त्वाच्या विमानतळांमध्ये स्थान मिळवेल, अशी अपेक्षा आहे.
या वाढत्या प्रवासी संख्या हाताळणीच्या दृष्टीने, विमानतळाची पार्किंग क्षमता दुप्पट केली असून, आता तीन ऐवजी सहा विमाने एकावेळी पार्क करता येणे शक्य आहे. यामुळे पुढच्या काळात हे विमानतळ अधिक वेगाने विकसित होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
याबाबत आयआरबी सिंधुदुर्ग विमानतळाचे मुख्य सल्लागार आणि प्रमुख कॅप्टन जय एस. सदाना म्हणाले की, ‘या नव्या मान्यतेमुळे विमानतळाची विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. यामुळे विमान कंपन्यांचा आत्मविश्वास वाढेल. वाहतूक वाढीस चालना मिळेल आणि कोकण प्रदेशातील आर्थिक आणि पर्यटन विकासात अर्थपूर्ण योगदान मिळेल.
याकरिता नियामक प्राधिकरण व अधिकारी आणि सरकारच्या मार्गदर्शन आणि पाठिंब्याबद्दल आम्ही आभारी आहोत. राज्य प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत मुंबई-सिंधुदुर्ग विमान मार्गही येत्या काही महिन्यांत सुरू होण्याची अपेक्षा असून यामुळे कनेक्टिव्हिटीमध्ये आणखी सुधारणा होईल व कोकण प्रदेशातील रहिवाशांसाठी प्रवास अधिक सुखकर व सोयीस्कर होईल. शिवाय पर्यटनालाही चालना मिळेल.’
पर्यटन विस्तारास बळ
चिपी विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा निर्माण झाल्यामुळे देशभरातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात विमानसेवा विस्तारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याआधी केवळ दिवसा विमान सेवा असल्याने फेऱ्यांसाठी आवश्यक स्लॉट मिळण्यात अडचणी होत्या.
त्यामुळे ही सेवा मर्यादित स्वरूपाची झाली होती. आता येथे येणाऱ्या विमान फेऱ्यांची संख्या वाढणार आहे. याचा थेट प्रभाव सिंधुदुर्गच्या पर्यटनावर होणार आहे. या विमानतळापासून जवळ वेंगुर्ले मालवण आणि देवगड येथील कित्येक पर्यटनस्थळे वेगवान दळणवळणाने अधिक प्रभावीपणे जोडली जाणार आहेत.
या निर्णयामुळे कोकणातील आर्थिक आणि पर्यटन विकासाला आणखी गती येण्यास फायदा होईल. आम्हीही आमच्याकडून जास्तीत जास्त उत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत.
- कॅप्टन जय एस. सदाना, आयआरबी सिंधुदुर्ग विमानतळाचे मुख्य सल्लागार आणि प्रमुख
Q1. सिंधुदुर्ग विमानतळाला कोणती मंजुरी मिळाली आहे?
➡️ DGCA कडून IFR लायसन्स आणि ऑपरेशन मंजुरी मिळाली आहे.
Q2. या मंजुरीमुळे काय बदल होणार आहेत?
➡️ आता 24 तास विमानसेवा सुरू राहील आणि नाईट लँडिंग शक्य होणार आहे.
Q3. आधी नाईट लँडिंग का शक्य नव्हते?
➡️ DGCA कडून ऑल वेदर ऑपरेशन्सची मंजुरी नव्हती.
Q4. या निर्णयाचा कोकणावर काय परिणाम होईल?
➡️ पर्यटन, व्यापारी आणि दळणवळण सुविधांना मोठा फायदा होणार आहे.
Q5. विमानतळावर आणखी कोणती सुविधा वाढवण्यात आली आहे?
➡️ विमानतळावरील पार्किंग क्षमता दुप्पट करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.