

Disha Salian Death Case News : महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिशा सालियन प्रकरणावरून सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच शनिवारी (ता.19) मातोश्री बाहेर हाय होटल्टेज घडामोडी घडल्या. दिवंगत दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी शिवसेनेचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांना 500 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करणारी कायदेशीर नोटीस बजावली.
यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. यानंतर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही मात्र भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी सोशल मिडीयावर काहीच शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दिशा सालियन प्रकरणावरून सतीश सालियन आणि त्यांचे वकील आदित्य ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी शनिवारी जाणार असल्याचे आधीच सांगितले होते. याप्रमाणे ते तेथे गेले. यावेळी तेथे दुपारी जोरदार हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. तर आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन प्रकरणात सोशल मीडियावर पोस्ट करत खुलासा केला होता.
आपण दिशा सालियनला ओळखत नसल्याचे सांगत दावा केला होता. या दाव्यानंतरच सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. त्यांनी स्वत: वकील ओझा यांच्यासह मातोश्रीवर जाऊन नोटीस बजावली. तर देशमुख यांना नोटीस रजिस्टर केली जाईल असे सांगितले होते.
दरम्यान आता या प्रकरणावर पुन्हा एकदा नितेश राणे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी या प्रकरणावर एक पोस्ट केली आहे. पण या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतलेले नाही. माझ्या सर्व प्रसारमाध्यमांमधील मित्रांनो... दिशा सालियन प्रकरणाबाबत कायद्याला त्याची प्रक्रिया पूर्ण करू द्यावी! असे आवाहन केले आहे. तर या विषयावर रोज भाष्य करणे माझ्यासाठी योग्य नाही, धन्यवाद, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
मात्र आता त्यांनी अशी मोजक्याच शब्दात केलेल्या पोस्टमुळे त्यांना वरिष्ठांनी केलेली तंबी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. नुकताच उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंवर होणाऱ्या राजकीय आरोपांविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. ज्यानंतर भाजपकडून सावध भूमिका घेतली जात आहे.
सातत्यानं आदित्य ठाकरेंना टार्गेट करणाऱ्या आमदार नितेश राणे यांचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीच कान टोचले होते. त्यांनी, प्रत्येक कार्यकर्त्यानं, पदाधिकाऱ्यानं सगळ्यांनीच आपण काय बोलावं आणि काय सांगाव? याकडं लक्ष द्यावं. पुराव्याअभावी कधी बोलू नये. या सगळ्यामध्ये एखादी गोष्ट जोपर्यंत आपल्याला माहिती नाही, किंवा त्याचे पुरावे आपल्याकडं नाही त्यावर आपण बोलता कामा नये, असे म्हणत तंबी दिली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.