Mumbai News : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय घडामोडीना वेग आला आहे. दिशा सालियानचे वडील सतीश सालियान हे सातत्याने आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करताना दिसत आहेत. आता सीबीआयकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. त्यातच आता दिशा सालियनचे वडिल सतीश सालियन यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात 500 कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा केला आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच या प्रकरणावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना मोठा दावा केला आहे. चौकशी करणाऱ्या संस्था सत्य बाहेर आणतील, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
कोर्टाच्या आदेशानंतर दिशा सालियान प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडून केला जात आहे. या प्रकरणावरून राज्यातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नाशिक येथे प्रसार माध्यमाशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, 'दिशा सालियन मृत्यू प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे. चौकशी करणाऱ्या संस्था सत्य बाहेर आणतील. '
कुंभमेळ्याच्या बैठकीबाबत बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले की, त्यांच्या बैठकीला मला जाता आले नाही. अधिकारी येऊन मला सांगणार आहेत. त्यांनी जबाबदारी घेतली आहे, ते जबाबदारी पार पाडणार आहेत. सर्व काम वेळेत आणि चांगली होणार आहेत. जे ठरले आहे तसे झाले पाहिजे, वेळेत काम करावे असे वाटते.
त्र्यंबकेश्वर येथे पर्यटकांना झालेल्या मारहाणीच्या घटनेवर भुजबळ यांनी चिंता व्यक्त केली. पर्यटन हा जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असून, अशा घटनांमुळे पर्यटकांमध्ये भीती निर्माण होऊ शकते. याबाबत पोलीस अधीक्षक स्वामी साहेबांशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांकडून सतत गस्त घालणे आणि अशा घटनांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. केवळ पोलीस ठाण्यात बसून न राहता, पोलिसांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
गंगापूर रोडवर जाहिरात फलकांसाठी ५० झाडे कापल्याच्या घटनेची त्यांनी गंभीर दखल घेतली. महानगरपालिका आयुक्तांशी बोलून संबंधित जाहिरात कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. कुंभ जागा अधिग्रहणावर बोलताना भुजबळ म्हणाले की, जर 38 हजार कोटी खर्च करणार आहेत. मागचे पैसे देणे आहे ते दिलेच पाहिजे. कोणावर अन्याय करता कामा नये.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.