
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली.
या बैठकीत रायगड व नाशिकच्या पालकमंत्रिपदावरील रखडलेला निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे.
१५ ऑगस्टपूर्वी रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटण्याची शक्यता असून अमित शाहांनी तडजोडीच्या सूचना दिल्या आहेत.
Raigad News : राज्यात महायुती सत्तेत येऊन आता जवळपास 8 महिने होत आहेत. आता 15 ऑगस्टही जवळ आला आहेत. मात्र अद्याप रायगडसह नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर होते. त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची देखील दिल्लीत भेट घेतली. या भेटील रखडलेल्या रायगडसह नाशिकच्या पालकमंत्रिपदावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच रायगडच्या पालकमंत्रिपदावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मुख्य नेत्यांनी बसून तोगडा काढवा अशाही सूचना अमित शाह यांनी दिल्या असून 15 ऑगस्टआधी रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. दरम्यान नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्नही सोडवावा अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. (Eknath Shinde’s Delhi meeting with PM Modi and Amit Shah over the Raigad and Nashik guardian minister dispute likely to bring resolution before Independence Day)
एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवेळी रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मुख्य नेत्यांनी बसून हा प्रश्न सोडवावा अशा सूचना केल्या आहेत. यानंतर लेगच शिंदे आणि सुनील तटकरे यांच्यात दिल्लीत बैठक झाली. त्यामुळे 15 ऑगस्टआधी रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान मंत्री आदिती तटकरे यांनी देखील रायगडच्या पालकमंत्रिपदावर मोठं भाष्य करताना, पालकमंत्री पद म्हणजे सर्वस्वच नाही, हा त्यातला एक छोटासा भाग आहे.
पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य त्यावेळी निर्णय घेतील. रायगड आणि नाशिक जिल्ह्यावर अन्याय होणार नाही आणि निधीची कमतरता भासणार नाही याची काळजी महायुतीतील तिन्ही नेते घेतील. महायुतीसाठी पालकमंत्रीपद एक मोठी अडचण आहे असं अजिबात नाही. काही अडचणी असल्या तर त्यावर व्यापक चर्चा होणं देखील आवश्यक आहे. वरिष्ठ नेत्यांना जेव्हा योग्य वाटेल तेव्हा ते पालकमंत्री पदासंदर्भातला निर्णय घेतील, असेही मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.
तर या बैठकीबाबत तटकरे यांना विचारले असता त्यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत आमची भेट झाली नाही. शिंदे साहेब दिल्लीत आले होते. त्यांनी येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीत पालकमंत्रिपदाबाबत चर्चा झाली नाही. आमच्या भेटीचा तो विषय नव्हता असेही स्पष्टीकरण तटकरे यांनी दिले आहे. दरम्यान याबाबत जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी तटकरे यांनी रायगडच्या प्रश्नावर चर्चा केली असेल तर ठिक आहे. पण त्यांनी नाशिकबद्दल ही चर्चा करायला हवी.
आता 15 ऑगस्टला जवळ आला असून नवीन पालकमंत्र्यांच्या हस्ते रायगडसह नाशिकमध्ये झेंडावंदन होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेला (शिंदे) जात की राष्ट्रवादीला आणि नाशिकमध्ये हा मान राष्ट्रवादीला मिळतो की भाजपला हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.
प्र.1: एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत कोणत्या नेत्यांची भेट घेतली?
उ: त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली.
प्र.2: या भेटीचे कारण काय होते?
उ: रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरील तिढा सोडवणे आणि मंत्रिपदावरील चर्चा हे प्रमुख मुद्दे होते.
प्र.3: रायगडच्या पालकमंत्रिपदावर निर्णय कधी अपेक्षित आहे?
उ: १५ ऑगस्टपूर्वी निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.