NCP Demand ED : शिंदेंच्या आमदाराला घेरण्यासाठी तटकरेंचा शिलेदार मैदानात, थेट ईडीचा उल्लेख करत दिला इशारा

Mahendra Thorve Sudhakar Ghare controversy : कर्जत-खालापूर तालुक्यातील प्रस्तावित पोशीर, शिलार धरण आणि टोरेंट प्रकल्पांवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद सुरू झाला आहे.
Karjat Dam Projects Political Row; Eknath Shinde Shivsena MLA Mahendra Thorve And MP Sunil Tatkare's leader Sudhakar Ghare
Karjat Dam Projects Political Row; Eknath Shinde Shivsena MLA Mahendra Thorve And MP Sunil Tatkare's leader Sudhakar GhareSarkarnama
Published on: 
Updated on: 

Raigad News : कर्जत-खालापूर तालुक्यातील प्रस्तावित पोशीर, शिलार धरण आणि टोरेंट पंप्ड स्टोरेज प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. थोरवे यांनी राष्ट्रवादीचे काही एजंट जमिनी खरेदी करत असल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर घारे यांनी देत थोरवेंच्या आरोपांची चिरफाड केली आहे. तसेच थोरवे यांच्यावर थेट हल्लाबोल करत आमदारांच्या घरचे आणि जवळचेच धरणाच्या जमिनीची दलाली करतात, असा गंभीर आरोप घारे यांनी केला. तसेच थोरवेंच्या आर्थिक व्यवहारांची ईडीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे

रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याच्याआधी प्रकल्पावरूनच थोरवे यांनी घारे यांच्यावर टीका करताना स्टंटबाजी करण्याचा आरोप केला होता. यामुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

आता पुन्हा एकदा थोरवे यांनी कर्जत-खालापूर तालुक्यातील प्रस्तावित पोशीर, शिलार धरण आणि टोरेंट पंप्ड स्टोरेज प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर घारे यांना घेरत टीका केली होती. तसेच शेतकरी व आदिवासींनी आपल्या जमिनी दलाल किंवा इन्व्हेस्टरना विकू नयेत, असे आवाहन देखील केले होते. तर राष्ट्रवादीचे काही एजंट जमिनी खरेदी करत असल्याचा आरोप केला होता.

Karjat Dam Projects Political Row; Eknath Shinde Shivsena MLA Mahendra Thorve And MP Sunil Tatkare's leader Sudhakar Ghare
'तटकरे गुन्हेगारांना वाचवतात' थोरवेंचा गंभीर आरोप Mahendra Thorve, Sunil Tatkare, Raigad News

या सर्व आरोपांना घारे यांनी प्रत्युत्तर देत थोरातांच्या आरोपांची चिरफाड केली आहे. घारे यांनी, राष्ट्रवादीचे एजंट म्हणून कोणी फिरत नसून थोरवे यांच्या कुटुंबातील व नात्यातील व्यक्ती एजंट म्हणून फिरत असल्याचा आरोप केला.

शेतकऱ्यांच्या जमिनी कोणाच्या माध्यमातून हस्तगत होत आहेत, याची माहिती योग्य वेळी मांडू, असा देखील इशारा देताना आदिवासींच्या जमिनी विकणारे नेमके कोण आहेत याची माहिती कर्जत तालुक्यातील जनतेला आहे. हे काम थोरवेंचे बगलबच्चे करत आहेत, असा दावा घारे यांनी केला.

यावेळी घारे यांनी, थोरवे २० वर्षांपूर्वी कुठे होते, असा सवाल केला असून थोरवेंच्या आर्थिक व्यवहारांची ईडीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तर आपली देखील ईडी चौकशी करा, असे आव्हान देखील घारे यांनी दिले आहे.

Karjat Dam Projects Political Row; Eknath Shinde Shivsena MLA Mahendra Thorve And MP Sunil Tatkare's leader Sudhakar Ghare
'खोपोली प्रकरणात Beed कनेक्शन', थोरवेंचा मोठा गौप्यस्फोट Mangesh Kalokhe Case, Mahendra Thorve

थोरवेंना लक्ष्य करताना ज्या शिवसैनिकांनी २०१९ मध्ये त्यांना निवडून दिले ते त्यांच्याच विरोधात गेले. ज्या भरत भगत यांच्यामुळे ते निवडून आले त्यांनाच त्यांनी जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला असेही गंभीर आरोप घारे यांनी थोरवेंवर केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com