

शिंदेंच्या शिलेदाराने 50 पैकी 32 जागा शिवसेनेच्या वाट्याच्या असल्याचा ठाम दावा केला आहे.
त्यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजपवर दबाव टाकत थेट लढाईचा इशारा दिला आहे.
या वक्तव्यामुळे महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Sindhudurg News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून तळकोकणातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापलं आहे. भाजप नेते तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी महायुती नाही तर मैत्रिपूर्ण लढती होतील असे जाहीर केले आहे. त्यांनी शिवसेना नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर ही घोषणा केली होती. ज्यावर त्यांचेच बंधू आमदार निलेश राणे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर फक्त शिवसेनेचाच भगवा फडकणार असा निर्धार केला आहे. त्यांच्या या निर्धारामुळे आता जिल्ह्यात आगामी स्थानिकच्याआधीच दोन भाऊ एकमेकांच्या समोर ठाठल्याचे चित्र तयार झाले आहे.
नितेश राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याची घोषणा केली असून जिल्ह्यात युती नाही तर मैत्रिपूर्ण लढती होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच जिल्ह्यातील आगामी स्थानिकबाबत भाजप म्हणून आमची तयारी झाली असून आमची आणि शिंदेंच्या शिवसेनेची नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये मोठी ताकद आहे. आमच्याकडे उमेदवारही आहेत. यामुळे युती न करता वेगळे लढल्याने कार्यकर्त्यांना न्याय देता येईल आणि त्याचा लाभ महाविकास आघाडी असो किंवा ठाकरेंच्या शिवसेनेलाही मिळणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते.
नितेश राणे यांच्या या घोषणेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. ज्यानंतर बंधू शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी देखील भाजप विरोधात दंड थोपाटले. त्यांनी, जिल्ह्यात शिवसेना आता स्वबळावर लढणार आहे. यामुळे प्रत्येक शिवसैनिकाने आपला भगवा जिल्हा परिषदेवर फडकावण्यासाठी मेहनेत घ्यावी असे आवाहन केले होते. या अहवानानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर राणे-विरूद्ध राणे असा राजकीय वादाला सुरूवात झाली आहे.
एकीकडे भाजप आणि शिवसेना यांच्या वर्चस्व वादाची लढाई जोर धरत असतानाच नितेश राणे आणि निलेश राणे यांनी स्वबळाची घोषणा केली आहे. यामुळे दोन्ही पक्षातील बंडखोरी टाळण्यास आता मदत होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तोच निलेश राणेंनी अप्रत्यक्षरीत्या भाजपवर दबाव टाकत थेट लढण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेवर 50 जागा असून 32 जागावर शिवसेनेचा दावा सांगितला आहे. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीवर शिवसेनेचाच भगवा फडकेल असाही दावा निलेश राणे यांनी केला आहे.
त्यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकीत 100 टक्के शिवसेनेचाच भगवा फडकेल. तर कुडाळ-मालवण, सावंतवाडी व कणकवलीत ही आपल्याला भगवा फडकवायचा आहे असे कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. तसेच उमेदवार कोणीही असला तरी त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आपली असून 100% सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात तीन पैकी शिवसेनेचे दोन आमदार आहेत आणि 32 जागांवर आम्ही थेट दावा करतोय असेही सांगत निलेश राणे यांनी 50 जागा पैकी 32 जागावर दावा ठोकला आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निलेश राणे विरुद्ध नितेश राणे असा सामना होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
1. निलेश राणेंनी कोणता दावा केला आहे?
त्यांनी सांगितले की, 50 पैकी 32 जागांवर शिवसेनेचा हक्क आहे.
2. हा दावा कोणत्या पार्श्वभूमीवर केला गेला?
स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपावरून हा दावा करण्यात आला.
3. त्यांनी भाजपला कोणता संदेश दिला आहे?
निलेश राणेंनी अप्रत्यक्ष इशारा देत सांगितले की, आवश्यक असल्यास शिवसेना थेट लढेल.
4. या वक्तव्याचा महायुतीवर काय परिणाम होऊ शकतो?
महायुतीत तणाव वाढण्याची आणि जागावाटपावरून मतभेद तीव्र होण्याची शक्यता आहे.
5. या विधानानंतर काय प्रतिक्रिया उमटल्या आहेत?
स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आणि असंतोष दिसून आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.