ZP Elections : तळकोकणात शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपचा 'करेक्ट कार्यक्रम', माजी शहराध्यक्षासह बूथ अध्यक्षांना फोडत दिला इशारा

Shiv Sena Vs BJP : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्यापूर्वीच शिवसेनेकडून जिल्ह्यात मित्र पक्षाचाच करेक्ट कार्यक्रम केला जात आहे.
ZP Elections Politics Nilesh Rane And EX BJP Leader Ajay Gondawale Jion Shivsena
ZP Elections Politics Nilesh Rane And EX BJP Leader Ajay Gondawale Jion Shivsena sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने भाजपचा “करेक्ट कार्यक्रम” सुरू केला आहे.

  2. माजी शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

  3. जिल्हाप्रमुख संजू परब यांनी भाजपला आगामी काळात मिळेल तेथे प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला.

Sindhudurg News : जिल्ह्यातील सावंतवाडी शहर भाजपला आगामी स्थानिकच्या आधी पक्षांतर्गत कलहाचा मोठा फटका बसला आहे. येथे भाजपला मोठा राजकीय धक्का बसला असून माजी शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांच्यासह तीन बूथ अध्यक्ष आणि जवळपास महत्वाचे 50 पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या सर्वांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असून भाजपवर गंभीर आरोप देखील केले आहे. यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब यांनी देखील भाजपला खडे बोल सुनावत आगामी काळात मिळेल तेथे करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा दिला आहे. यामुळे महायुतीतील मित्र पक्षांमध्येच आता पक्ष वाढिची तीव्र लढाई सुरू झाल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तर येणाऱ्या स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपसाठी मोठा धक्का ठरू शकतो असेही येथे बोलले जात आहे.

भाजपचे माजी सावंतवाडी शहर अध्यक्ष व विद्यमान जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजय गोंदावळे यांनी तीन बूथ अध्यक्ष व चाळीस कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ‘‘पक्षांतर्गत कलहामुळे आपण दुखावलो असून, पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे गोंदावळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच हा प्रवेश मैत्रीपूर्ण प्रवेश असून, आणखी असेच मैत्रीपूर्ण पद्धतीचे प्रवेश आगामी आठ दिवसांत शहरात होतील असा इशारा भाजपला शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिला आहे. तसेच गोंदावळे यांच्यासोबत सर्वांचा शिवसेनेत योग्य मानसन्मान राखला जाईल, असाही विश्वास त्यांनी दाखवला आहे.

यावेळी गोंदावळे म्हणाले, ‘‘गेली साडेचार वर्षे भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता या नात्याने शहराध्यक्ष म्हणून पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने आणि सक्षमपणे पार पाडली. त्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष तसेच नेते व आदींनी वेळोवेळी सहकार्य केले. मात्र, सद्य:स्थितीत पक्षांतर्गत कलह निर्माण झाला असून याचा त्रास माझ्यासोबत बऱ्याच लोकांना होत आहे.

ZP Elections Politics Nilesh Rane And EX BJP Leader Ajay Gondawale Jion Shivsena
ZP Election : मंत्री जयकुमार गोरेंच्या कट्टर विरोधकाने शड्डू ठोकलाच : भावाला ZP वर पाठवण्यासाठी लागणार वेगळी 'स्ट्रॅटेजी'

मला इतरांपेक्षा जास्त त्रास झाल्याने पक्ष सोडण्याचा निर्णय मी घेतला. माझा राजीनामा जिल्हाध्यक्षांना व्हॉट्स-अॅपवर पाठवला आहे. आमदार केसरकर, आमदार नीलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष संजू परब यांच्यावर आपला विश्वास आहे. यामुळेच आपण शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचेही स्पष्ट त्यांनी सांगितले. तसेच दोन दिवसांत अन्य काही प्रवेश होतील असेही त्यांनी संकेत दिले आहे.

भाजपच्या येथील स्थानिक नेतृत्वाने आगामी निवडणुका मैत्रीपूर्ण पद्धतीने लढवल्या जातील, असे स्पष्ट केले. त्याच धर्तीवर गोंदावळे यांचा हा प्रवेश मैत्रीपूर्ण आहे. त्यांच्याकडे दातृत्व व नेतृत्व हे दोन गुण असल्याने त्यांची ताकद शहरासह त्यांच्या वॉर्डमध्ये निश्चितच मोठी आहे. शहरातील अनेकांशी त्यांचे संबंध असल्याने त्यांचाही आठ दिवसांत पक्षप्रवेश घेण्यात येणार आहे.

इथे आठ दिवसांत मैत्रीपूर्ण पद्धतीने असे करेक्ट कार्यक्रम केले जातील. गोंदावळे यांच्या पाठीमागे आमदार केसरकर आणि आमदार राणे यांची ताकद आहे. यामुळे त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही.’’ असे परब यांनी म्हटले आहे. तर ज्यांना गोंदावळे यांच्या प्रवेशाबाबत काही बोलायचे असेल तर त्यांनी गोंदावळे यांना फोन न करता मला करावा, मी त्यांना योग्य ते उत्तर देईन, असा सल्लाही परब यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षांचे नाव न घेता दिला आहे.

येणाऱ्या दिवसात ‘करेक्ट कार्यक्रम’

निवडणुकीमध्ये हार आणि जीत हा भाग असतोच, त्यामुळे कोणालाही आपण घाबरत नाही. अंगावर येणाऱ्याला शिंगावर घेण्याची तयारी माझ्यात आहे. कारण मी लढवय्या आहे. तुम्ही मला काहींनी (भाजप) आव्हान दिले, घेऊन दाखवा; आता घेऊन दाखवलंच आणि येणाऱ्या दिवसांतही असे अनेक ‘करेक्ट कार्यक्रम’ घेऊन दाखवणार, असल्याचा दावाही जिल्हाप्रमुख परब यांनी केला आहे. तर थेट मित्र पक्ष भाजपलाच आता आव्हान दिले आहे.

ZP Elections Politics Nilesh Rane And EX BJP Leader Ajay Gondawale Jion Shivsena
Satara ZP Election : मंत्री जयकुमार गोरेंची क्लीन स्वीपची रणनीती; मोठा शब्द देऊन बंधू शेखर गोरेंना मॅनेज करणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com