Kirit Somaiya viral video : सोमय्या यांच्या अडचणीत वाढ; दानवेंचा पेन ड्राईव्ह आणि फडणवीसांची घोषणा...

आमदार अनिल परब यांची एसआयटी नेमण्याची मागणी केली आहे.
Kirit Somaiya
Kirit Somaiya Sarkarnama

Mumbai News : भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ एका मराठी वृत्तवाहिनीने व्हायरल केला आहे. त्यावरून विरोधकांनी सोमय्यां यांच्याविरोधात रान उठवले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत एक पेन ड्रायईव्ह उपसभापतींकडे जमा केला आहे, तर आमदार अनिल परब यांची एसआयटी नेमण्याची मागणी केली आहे. विरोधकांची आक्रमक मागणी पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कुणालाही पाठीशी घालणार नसल्याची ग्वाही देत सखोल चौकशीची घोषणा केली आहे. (Kirit Somaiya's troubles increase)

भाजप नेते सोमय्या (Kirit Somaiya) यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. विरोधकांकडून भाजप (BJP) आणि सोमय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. खुद्द सोमय्या यांनीच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Kirit Somaiya
Bacchu Kadu News : मुख्यमंत्र्यांची अडचण पाहून मंत्रिपदावरील दावा सोडला; पण या आमदाराला मंत्री करा, बच्चू कडूंची नवी मागणी

सोमय्या यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणाचे तीव्र पडसाद विधान परिषदेत उमटले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी काही महिलांच्या मजबुरीचा फायदा घेतला आहे. त्यांनी पक्षातील काही महिलांना पदे, जबाबदारी, महामंडळ देतो, असे सांगून फसविले आहे.

Kirit Somaiya
Maharashtra Monsoon Session : मुख्यमंत्र्यांकडील खातं शंभूराज देसाईंकडं आलं अन्‌ शेलार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरातांनी घेरलं...

अनेक मराठी भगिनींना त्यांनी फसविले आहे. त्यांना ब्लॅकमेल केले आहे. महाराष्ट्राबाहेरून आलेले हे उपरे मराठी भगिनींचा छळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्याकडे त्यांचा एक पेनड्राईव्ह आहे, त्यात अनेक किळसवाणे व्हिडिओ आहेत. त्यामुळे त्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही दानवे यांनी केली.

दरम्यान, शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनीही किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओ प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी लावून धरली. तसेच, सोमय्या यांनी अनेकांना त्रास दिला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Kirit Somaiya
NDA Meeting : भाजपचा जानकर, खोतांना धक्का; NDAच्या बैठकीचे निमंत्रण नाही, जानकर म्हणाले, ‘मी भीक मागणार नाही...’

दरम्यान, आमदारांच्या संतप्त भावना पाहून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. यात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. तसेच हे प्रकरण दाबले जाणार नाही, अशी ग्वाही देत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल, असा शब्द विरोधकांना दिला. फडणवीस यांच्या चौकशीची घोषणा आणि दानवे यांनी दिलेला पेनड्राईव्ह दिल्याने सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com