Irshalwadi Landslide: उद्धव ठाकरे इर्शाळवाडीत; लोकांना दिला धीर, पुनर्वसनासाठीही पुढाकार

Uddhav Thackeray On Irshalwadi Landslide: "इर्शाळवाडीतील दुर्घटना ही राजकारण्यांसाठी लाजीरवाणी"
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Raigad News: रायगडमधील इर्शाळवाडीत घडलेल्या दुर्घटनेनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुर्घटनाग्रस्तांशी संवाद साधला. इर्शाळवाडीतील नागरिकांचे पुनर्वसन होईपर्यंत आम्ही थांबणार नाहीत, असे आश्वासन देत इर्शाळवाडीच्या नागरिकांशी ठाकरे यांनी संवाद साधला.

इर्शाळवाडीच्या घटनेनंतर आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यानंतर आज ठाकरेंनी संवाद साधत इर्शाळवाडीचे पुनर्वसन होईपर्यंत जी मदत लागेल ती आम्ही देऊ, असं सांगितलं. तसेच येथील लोकांना कंटेनरमध्ये जास्त काळ राहावं लागणार नाही, याची काळजी येथील अधिकाऱ्यांनी घ्यावी. तो पर्यंत सर्वांनी एकत्र राहावं, असं आवाहन ठाकरेंनी केलं.

Uddhav Thackeray
Dr. Vikhe Patil News : वाळू तस्करांना दणका, महसूलमंत्र्यांनी घेतला `हा` निर्णय!

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

"आज महाराष्ट्रामध्ये असे अनेक ठिकाणं आहेत तेथे दरडी कोसळू शकतात. पण अशा दुर्घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. इर्शाळवाडीतील दुर्घटना ही राजकारण्यांसाठी लाजीरवाणी आहे. दुर्घटना झाल्यानंतर आपण धावपळ करतो. मात्र, इर्शाळवाडी सारख्या घटना पुन्हा घडू नये, यासाठी मोठी एखादी योजना आखली गेली पाहिजे.

सरकार कोणाचेही असो, पण यामध्ये कोणीही राजकारण आणू नये. आज मी सरकारकडे जनतेचं सरकार म्हणून पाहतो. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं. तळेगावमध्येही अशी दुर्घटना घडली होती त्यानंतर तेथे किती पुनर्वसन झालं आहे, याची माहिती देखील मी घेणार आहे", असं उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

Uddhav Thackeray
Maharashtra Politics : राष्ट्रवादीतील फुटीरांनी शरद पवारांचा फोटो पुन्हा वापरला

इर्शाळवाडीत दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. या घटनेत २४ लोकांचा मृत्यू झाला. तसेच अजूनही काही लोकं बेपत्ता आहेत. प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू असून उद्धव ठाकरेंनी आज येथे भेट देऊन पिडीत कुटुंबाचे सांत्वन केले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com