
मनसेतून बाहेर पडलेले वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश दुसऱ्यांदा हुकला.
मंत्री उदय सामंत यांनी थेट ऑफर देत म्हटले की, शिवसेनेत आले तर प्रवेश रद्द होणार नाही.
या विधानामुळे तळकोकणातील राजकारणात खळबळ उडाली असून चर्चा रंगली आहे.
Ratnagiri News : सगल दुसऱ्यांचा मनसेतून बडतर्फ झालेल्या वैभव खेडेकर यांचा भाजपप्रवेश रखडला. यामागे दस्तुरखुद्द राज ठाकरे यांचा हात असल्याची तळकोकणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जोरदार निशाना साधला आहे. त्यांनी खेडेकर यांच्या सारख्या समाजकार्य करणाऱ्या माणसाचा तीन तीन वेळी पक्षप्रवेश रखडत असल्याने त्यांचे राजकीय खच्चीकरण केलं जातयं असा दावा केला आहे. यामुळे तळकोकणात नव्या राजकीय चर्चांना उधान आले आहे.
मनसे वाढणाऱ्या खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि तिघांची पक्षाने हाकालपट्टी केली. तर भाजपशी सलगी केल्याच्या आरोपावरून राज ठाकरे यांच्या सूचनेनंतर पक्षाने हा निर्णय घेतल्याचा आरोप खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी आपण भाजप प्रवेश करणार असल्याचेही जाहीर केले होते. ज्यानंतर मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत 4 सप्टेंबर रोजी भाजप प्रवेश होईल अशी तारीख समोर आली होती. मात्र त्यावेळी काही कारणामुळे तो थांबवण्यात आला.
त्यानंतर दुसऱ्यांदा 23 सप्टेंबर रोजी खेडेकर मुंबईत गेले. त्यावेळी देखील त्यांचा भाजप प्रवेश झाला नाही. 350 हून अधिक कार्यकर्ते आणि काही पदाधिकारी त्यांच्याबरोबर त्यावेळी होते. त्यावेळी त्यांच्या स्वागताला भाजपचा एकदेखील महत्वाचा नेता तेथे उपस्थित नव्हता. यामुळेच आता त्यांचा भाजप प्रवेश रोखण्यात राज ठाकरे यांचा हात असल्याचे बोलले जात आहे. यामुळे खेडेकर यांचा नाराजी वाढल्याचेही बोलले जात असून त्यांची नाराजी दूर करण्याचे काम सध्या स्थानिकचे भाजपने नेते करताना दिसत आहेत.
अशातच उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत त्यांचा मुद्दा उपस्थित करत त्यांना थेट ऑफर दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खेडेकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पर्याय चाचपत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. सामंत यांनी, खेडेकर यांचा प्रवेश रखडलाय. पण त्यांनी देखील मला फोन केलेला नाही.
खेडेकर हे समाजात जाऊन काम करणारे नेतृत्व आहे. ते माझ्या जवळचे मित्र आहेत. पण त्यांचा भाजप प्रवेश तीन तीनदा का रखडला हे न उलघडलेला मुद्दा आहे. पण अशा पद्धतीने तीन तीन वेळा त्यांचा पक्षप्रवेश होत नाही. यामुळे एखाद्या कार्यकर्त्याचे खच्चीकरण होते. असे खच्चीकरण खेडेकर यांचे होऊ नये अशी आमची भावना आहे. तर अशा पद्धतीने तीन तीन वेळा पक्षप्रवेश न होणं हे देखील मनाला लागणारे आहे, असेही सावंत यांनी म्हटलं आहे.
यावेळी पत्रकारांनी ते शिवसेनेत आले तर त्यांना प्रवेश देणार का? ते शिवसेनेत येणार आहेत. हे त्याचेच संकेत तर नाही ना असाही सवाल केला. यावर सामंत यांनी, माझे त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. तुमच्याशी त्यांची चांगली ओळख असेल तर त्यांच्याशी बोला आणि मला सांगा. माझी गाठ घालून द्या. मग मी असे तीन तीनदा पक्षप्रवेश रद्द होणार नाही, याची मी हमी देतो असे म्हटलं आहे. त्यांची ही गॅरंटी एक प्रकारे खेडेकर यांना ऑफर असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे.
प्र.१: वैभव खेडेकर कोणत्या पक्षात जाण्याचा प्रयत्न करत होते?
उ: खेडेकर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते.
प्र.२: भाजप प्रवेश का फसला?
उ: अंतर्गत मतभेद आणि पक्षातील विरोधामुळे प्रवेश फसल्याचे समजते.
प्र.३: उदय सामंत यांनी काय विधान केले?
उ: सामंत म्हणाले, खेडेकर माझ्याकडे आले तर तीनदा प्रवेश रद्द होणार नाही.
प्र.४: आता खेडेकरांसाठी कोणता पर्याय उपलब्ध आहे?
उ: त्यांना शिवसेनेत प्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे.
प्र.५: या घडामोडीचा तळकोकणातील राजकारणावर काय परिणाम होईल?
उ: यामुळे भाजप-शिवसेना अंतर्गत स्पर्धा वाढेल आणि स्थानिक राजकारणात उलथापालथ होऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.