कोकणात शिवसेनेला धक्का : माजी उपनगराध्यक्षांनी काही महिन्यांतच सोडला पक्ष

राजापूरचे माजी उपनगराध्यक्ष विलास पेडणेकरांचा शिवसेनेचा राजीनामा
shivsena
shivsenasarkarnama
Published on
Updated on

राजापूर (जि. रत्नागिरी) : काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत (shivsena) प्रवेश केलेले राजापूरचे माजी उपनगराध्यक्ष विलास पेडणेकर यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांच्या मनमानीला आणि मागणीला कंटाळून शिवसेनेला रामराम करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माजी उपनगराध्यक्ष पेडणेकर यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढून राजीनाम्याबाबत माहिती दिली आहे. त्यामध्ये त्यांनी शिवसेनेचे राजापूर तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांच्यावर जोरदार शरसंधान केले आहे. आपण काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. भारतीय जनता पक्ष किंवा भाजपच्या कोणत्याही नेत्यांवर नाराज न होता. शिवसैनिक आणि शिवसेना पक्षामध्ये काही वरिष्ठ नेत्यांवर विश्वास ठेवून मी पक्षात प्रवेश केला होता.

shivsena
गिरीश महाजनांच्या विरोधात फास आवळला : टेंपोभर कागदपत्रे ताब्यात!

शिवसेनेतील प्रवेशानंतर तालुकाप्रमुख कुवळेकर यांच्या मनमानी कार्यपद्धतीचा अनुभव आला आहे. तालुका शिवसेना पक्षातील काही पदाधिकारी नेते कार्यकर्ते खरोखरच प्रामाणिक आहेत. मात्र, कुवळेकर हे कार्यकर्त्यांना दुखावून पक्षाचे नुकसान करत आहेत. त्यांच्या मनमानी कारभाराला आणि अवास्तव मागणीला कंटाळून आपण शिवसेना सोडत आहे, असे त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

shivsena
राजकारणात हिंमत दाखवावी लागते म्हणत शिवसेनेने उचकवले पर्रीकरांच्या मुलाला!

शिवसेनेतील प्रामाणिक नेते, कार्यकर्ता यांच्याशी माझे मित्र म्हणून जिव्हाळ्याचे संबंध यापुढेही कायम राहतील. मात्र, आपली पुढील दिशा लवकरच जाहीर करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com