

रत्नागिरी : रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी सर्वपक्षीय सहकार पॅनलचे गजानन पाटील यांची, तर उपसभापती गुहागरचे सुरेश सावंत यांची बिनविरोध निवड झाली. पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे संचालक असून सावंत राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. (Gajanan Patil of Shinde Group as Chairman of Ratnagiri Bazar Samiti)
रत्नागिरी (Ratnagiri) बाजार समितीच्या (Bazar Samiti) सभापती, उपसभापतिपदाची निवडणूक सोमवारी (ता. २९) झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रोहिदास बांगर, त्यांना साह्य करण्यासाठी सुधीर कांबळे आणि किशोर पाटील होते. बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय सहकार पॅनेलने वर्चस्व राखले होते. त्यामुळे पदाधिकारी निवडही बिनविरोध होणार, हे निश्चित होते; परंतु सभापतिपदाची (Sabhapati) लॉटरी कुणाला लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
सोमवारी सकाळी सहकार पॅनेलचे प्रमुख जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सभापतिपदासाठी गजानन पाटील यांचे नाव निश्चित केले गेले. पाटील यांच्यासाठी पालकमंत्री उदय सामंत, किरण सामंत यांनी महत्वाची भूमिका बजावली. तसेच, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव आणि आमदार शेखर निकम यांचेही सहकान पॅनेलला सहकार्य मिळाले. पाटील यांना सभापतीपद भूषवण्याची ही दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे.
दरम्यान, सर्वपक्षीय पॅनेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे शिवसेनेचेही संचालक आहेत. भाजप, काँग्रेसचाही सहभाग आहे. सभापती, उपसभापतीपदावर सर्वांना संधी मिळावी यासाठी सव्वा सव्वा वर्षांचा कालावधी निश्चित केली आहे. पहिली संधी शिंदे शिवसेनेचे पाटील, तर राष्ट्रवादीचे सावंत यांना दिली गेली.
गजानन पाटील धडाकेबाज सभापती
गजानन पाटील यांनी यापूर्वी सभापती असताना मच्छी वाहतुकीवर करआकारणीचा निर्णय घेतला होता. हा कर आकारल्यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली होती. या निर्णयामुळे धडाकेबाज सभापती म्हणून त्यांची ओळख झाली होती. ते पायउतार झाल्यानंतर करआकारणीमध्ये शिथिलता आली होती.
राज्यातील सत्तेच्या माध्यमातून योजना राबवू : गजानन पाटील
बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ करत असताना शेतकरी, मच्छीमार यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यात सत्ता असून, पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून विविध सरकारी योजनांचा लाभ लोकांना देणे शक्य आहे. आंबा महोत्सव, काजू शेतमाल तारण योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोचवू, असेही सभापती गजानन पाटील यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.