माझ्या पाठीशी मोदी-शहा-फडणवीसांची ताकद; निवडणुकीत ठाकरेंनाही हरवेन : आमदाराचे खुले आव्हान

महाविकास आघाडीचा एकच उमेदवार आपल्यासमोर उभा राहिला पाहिजे, हीच आपली इच्छा आहे. या सर्वांना मिळून एकदाच हरवता येईल.
माझ्या पाठीशी मोदी-शहा-फडणवीसांची ताकद; निवडणुकीत ठाकरेंनाही हरवेन : आमदाराचे खुले आव्हान

उरण : उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी (Mahesh Baldi) यांनी शिवसेना (Shivsena, उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ओपन चॅलेंज दिले आहे. मागच्या निवडणुकीत मी अपक्ष होतो. आता तर माझ्या पाठीमागे भाजपची ताकद आहे. मोदी, शहा, फडणवीस माझ्याबरोबर असणार आहेत, त्यामुळे मनोहर भोईर तर सोडाच; खुद्द उद्धव ठाकरे जरी उरणमध्ये उभे राहिले तरी त्यांनाही हरवेन, अशा शब्दांत आमदार बालदी यांनी ठाकरेंना ललकारले आहे. (I will also defeat Uddhav Thackeray in elections: Mahesh Baldi's open challenge)

उरणमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमात आमदार बालदी बोलत होते. शिवसेनेची जागा असल्यामुळे मागील निवडणुकीत भाजपला महेश बालदी यांना उमेदवारी देता आली नव्हती. त्यामुळे बालदी यांनी अपक्ष निवडणूक लढवून जिंकली होती. आज भाजपच्या व्यासपीठावर जात बालदी यांनी थेट ठाकरेंनाच आव्हान दिले आहे.

माझ्या पाठीशी मोदी-शहा-फडणवीसांची ताकद; निवडणुकीत ठाकरेंनाही हरवेन : आमदाराचे खुले आव्हान
Andheri By-Election : मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज बाद करा; शिवसेनेने घेतले 'हे' आक्षेप

आमदार बालदी म्हणाले की, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे. आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. जेव्हा आपल्यातील कर्तव्य संपतयं; तेव्हाच जात, धर्म, पंथाची भाषा केली जाते. माझ्यावरही आरोप झाले की हा मारवाडी आहे. बाहेरून आलाय. माझ्याविरोधात जे बोलत होते, ते डब्यात जाणार आहेत. माझा एक इच्छा आहे. परमेश्वराने आजपर्यंत आपल्या पाठीशी आशीर्वाद ठेवलेला आहे. महाविकास आघाडीचा एकच उमेदवार आपल्यासमोर उभा राहिला पाहिजे, हीच आपली इच्छा आहे. या सर्वांना मिळून एकदाच हरवता येईल.

माझ्या पाठीशी मोदी-शहा-फडणवीसांची ताकद; निवडणुकीत ठाकरेंनाही हरवेन : आमदाराचे खुले आव्हान
माझ्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमागे सांगलीपासून मुंबईपर्यंत अनेकांचा ‘हात’ : विश्वजित कदमांचा रोख कुणाकडे?

मागच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे हे दोन वेळा प्रचाराला आले. आदित्य ठाकरे एकदा आले, तरीही मी हरलो नाही. आगामी निवडणुकीत माझ्या पाठीशी कमळ असणार आहे. माझ्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील. त्यामुळे निवडणुकीत तुम्ही मला काय हरवणार आहात. स्थानिक मनोहर भोईर तरी सोडा. तुम्ही उरणमध्ये येऊन उभे राहा, तुम्हाला हरवेन, असं आव्हान मी तुम्हाला देतो, अशा शब्दांत आमदार बालदी यांनी उद्धव ठाकरे यांना ललकारले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com