Tukaram Mundhe : ठाणे महापालिकेत तुकाराम मुंढेंचे आगमन होणार? भाजपच्या आग्रही मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ

Tukaram Munde in Political Spotlight : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाची सुत्रे हाती घेताच राज्यात भेसळधारकांचे धाबे दणाणले आहेत. तर आता गुटखामाफियांना मकोका लावण्याचे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. यावरून सध्या त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
Thane Municipal Corporation; Tukaram Munde and Eknath Shinde
Thane Municipal Corporation; Tukaram Munde and Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Thane News : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळमाफियांविरोधात कारवाई सुरू करत खळबळ उडवून दिली आहे. एकीकडे ही कारवाई जोरदार सुरू असतानाच आता बेकायदेशीर गुटखा व्यवसाय करणाऱ्या टोळ्यांविरोधात धडक मोहिम उघडण्याचे धोरण त्यांनी हाती घेतले आहे. तसेच अशा गुटखामाफियांवर मकोका अंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत. यामुळे राज्यभरात भेसळमाफियांसह गुटखा रॅकेटमध्ये खळबळ उडाली आहे.

अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यात ठाण्यात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सारख्या अधिकाऱ्याला आणण्यासाठी भाजप आग्रही दिसत आहे. यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी आग्रह धरला असून वरीष्ठांशी याबाबत विनंती केली आहे. यामुळे भाजपच्या नगरसेवकांच्या मागणीनुसार मुंडे पॅटर्नसह ठाणे महापालिकेत मुंडेंना एन्ट्री मिळणार का? अशी चर्चा होताना दिसत आहे.

ठाण्यात शिंदेंची शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष अद्याप कमी झालेला नसून तो आणखी संघर्ष टोकाला गेला आहे. अशातच आता महापालिकेच्या उत्पन्नावरील दायित्वाचा भाराचा मुद्द्यासह विविध प्रकल्पातील अनियमत्तेवर भाजपकडून आरोप केले जात आहेत. शिवसेनेवर टीका केली जात आहे.

Thane Municipal Corporation; Tukaram Munde and Eknath Shinde
Tukaram Mundhe MCOCA action : गुटखा सिंडिकेटवर ‘मकोका’चा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे आक्रमक

दरम्यान आता तुकाराम मुंढे यांच्या आदेशामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई सुरू आहे. यावरूनच महापालिकेच्या आयुक्त पदावर तुकाराम मुंडे यांच्यासारख्या अधिकाऱ्याची नेमणूक व्हावी अशी आग्रही भूमिका भाजपच्या नगर सेवकांनी घेतल्याचे दिसत आहे. यासाठी भाजपच्या काही नगरसेवकांमध्ये चर्चा होताना दिसत असून तशी विनंती भाजपच्या वरीष्ठांकडे या नगरसेवकांनी केल्याचे दिसत आहे.

एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना महापालिकेला विशेष निधी उपलब्ध करत आर्थिक संकटातून सावरण्याचा प्रयत्न केला होता. या निधीतून रस्त्यांचे नूतनीकरण आणि विविध विकासकामांना गती देण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांत महापालिकेवरील आर्थिक दायित्व २,१०० कोटी रुपयांहून अधिक झाल्याचे उघड झाले आहेत.

Thane Municipal Corporation; Tukaram Munde and Eknath Shinde
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या आदेशाने बड्या रुग्णालयांचे धाबे दणाणले, सक्ती केली तर थेट कारवाई! आता औषधे...

आता चार महिन्यांपूर्वी येथे शिवसेना आणि भाजपची सत्ता आली असून दोन्ही पक्षातील नगरसेवकांमध्ये खटके उडताना दिसत आहे. भाजपकडून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. नियोजनशून्य कारभार, नागरिकांच्या तक्रारी, पाणीपुरवठा सारख्या मुद्द्यावरून भाजप टीका करत आहे.

दरम्यान काही महिन्यांच्या आधी उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरून प्रशासनाला फटकारले होते. ज्यानंतर खुद्द आयुक्त सौरभ राव यांनी घटनास्थळी जाऊन कारवाई करत अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला होता. या कारवाईनंतर आता आयुक्त सौरभ राव यांच्या बदलीची चर्चा वेग धरताना दिसत आहे.

तर त्यांच्या जागी आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वीही तुकाराम मुंडे यांची नियुक्ती होईल अशी चर्चा होती. पण ती झाली नाही. यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे.

Thane Municipal Corporation; Tukaram Munde and Eknath Shinde
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना कोणी दिली धमकी? धडक कारवायांच्या पार्श्वभूमीवर स्वतः दिलं स्पष्टीकरण; 'त्या' व्हायरल क्लीपवर थेटच बोलले

तर ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती नाही झाली तरी. त्यांच्यासारख्या कडक अधिकाऱ्याची गरज असल्याची चर्चा आहे. तर यासाठी भाजपचे काही नगरसेवक आग्रही आहे. यानिमित्ताने शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मुंडे पॅटर्नची चर्चा होताना दिसत असून तुकाराम मुंडे यांची महापालिकेत आयुक्तपदी नियुक्ती होणार का अशी चर्चा होताना दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com