Raigad News, 19 July : राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar) (अजित पवार गट) पक्षाचे खासदार सुनील तटकरे हे शुक्रवारी (ता. 19 जुलै) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावर होते. यावेळी महामार्गाच्या दुरवस्थेवर खासदार तटकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
शिवाय यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. महामार्गाच्या दुरावस्थेसाठी जे दोषी असतील त्यांच्यावर दखलपात्र गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देखील त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना दिल्या.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पाहणी दरम्यान तटकरे (Sunil Tatkare) यांनी हायवेच्या दुरवस्थेला कारणीभूत असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची लेखी तक्रार पोलिसांकडे केली. या तक्रारीद्वारे त्यांनी नॅशनल हायवेचे अधिकारी व संबधित ठेकेदारांवर गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. तटकरे यांनी स्वतः याबाबतची फिर्याद दिली.
दरम्यान, या सुनील तटकरे यांनी देखील त्यांच्या दौऱ्याबाबतची माहिती एक्सवर पोस्ट करत दिली आहे. त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "आज मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या (Mumbai-Goa National Highway) पाहणी दौऱ्यावर असताना पेण येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत सहभागी झालो.
यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे तत्काळ लक्ष देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या." त्यामुळे महार्गाच्या प्रश्नावरुन खासदार तटकरे चांगलेच आक्रमक झाल्याचं अधिकाऱ्यांसह स्थानिकांना पाहायला मिळालं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.