

Satara News: राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायती निवडणुकांच्या निकालाच्या अपडेट समोर यायला सुरुवात झाली आहे.महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.अशातच आता साताऱ्यातून पहिली धक्कादायक अपडेट समोर आली आहे.भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राज्य़ाचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना धक्का देत अपक्ष उमेदवार शंकर किर्दत यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.
साताऱ्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारासमोर महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आला. फलटणला रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर निवडणुकीच्या मैदानात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सातारा जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीची निवडणुकीसाठी चुरशीच्या लढतीत दोन्ही राजेंसह अनेक प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
साताऱ्यात (Satara) भाजपनं अमोल मोहिते यांना नगराध्यक्षपदाच्या मैदानात उतरवलं आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुवर्णा पाटील यांना नगराध्यक्षदासाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे. या निवडणुकीत महत्त्वाची बाब म्हणजे उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक त्यांच्या आघाड्यांऐवजी भाजपकडून लढत असल्याचं दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि मविआ यांची म्हसवडमध्ये आघाडी झाली आहे.याठिकाणी भुवनेश्वरी राजेमानेंना या आघाडीकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपच्या पूजा वीरकर निवडणूक लढवत आहेत. या ठिकाणी बसपाच्या रुपाली सरतापे याही निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.
सातारा पालिकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होईल अपेक्षा होती. त्यानुसार भाजपने नगराध्यक्षासह ५०, तर महाविकास आघाडीने नगराध्यक्षासह ४५ ठिकाणी उमेदवार दिले. मात्र, मनोमिलनाच्या माध्यमातून उमेदवार निश्चित करताना इच्छुकांचे समाधान करण्यात दोन्ही राजांना अपयश आले. त्यामुळे सद्यस्थितीत पालिकेच्या २५ पैकी २४ प्रभागांत दोन्ही राजांपुढे त्यांच्या कार्यकर्त्यांचे बंडखोरीचे आव्हान उभे राहिले होते.
प्रभाग क्रमांक एकमध्ये शिवेंद्रसिंहराजेंचे नेतृत्व मानणाऱ्या भाजपच्या प्रतीक मोहिते आणि उदयनराजे गटाचे बंडखोर शंकर किर्दत, प्रभाग क्रमांक पाचमध्ये शिवेंद्रसिंहराजे गटाचे विजय देसाई आणि उदयनराजे गटाचे बंडखोर राम हादगे, प्रभाग सहामध्ये उदयनराजे गटाचे बबन इंदलकर आणि शिवेंद्रसिंहराजे गटाचे बंडखोर अतुल चव्हाण, प्रभाग सातमध्ये उदयनराजे गटाचे मनोज शेंडे आणि शिवेंद्रसिंहराजे गटाचे बंडखोर आनंदा शेंडे, प्रभाग आठमध्ये शिवेंद्रसिंहराजे गटाचे विकास देशमुख आणि उदयनराजे गटाचे सुधाकर यादव यांच्यात समोरासमोर लढत झाली.
सातारा पालिकेच्या निवडणुकीला दोन्ही राजे मनोमिलन पॅटर्ननुसार लढती झाल्या होत्या. त्यांच्या या मनोमिलन पॅटर्नला बहुतांशी ठिकाणी बंडखोरांनी आव्हान दिले होते. या बंडखोरांमुळे अनेक प्रभागांतील लढतीत पेच निर्माण झाला असून, यात कोण बाजी मारतो, याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले होते. निवडणुकीनंतर दोन्ही राजांच्या पालिकेतील सत्ताबळाचे गणित प्रबळ बंडखोरांवर अवलंबून राहण्याची चिन्हे असणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.