Crime News : रायगडमध्ये थरारक हत्याकांड! बैलगाडी शर्यतीच्या मैदानावर तरुणाची निर्घृण हत्या; चेहऱ्यावर ॲसिड टाकून तो विद्रूप केला

Nevali Village Murder Case : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकून तो विद्रूप करण्यात आला आहे.
Crime News
Crime News Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Raigad Crime News : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एका तरुणाच्या निर्घृण हत्येची घटना उघडकीस आली आहे. नेवाळी गावातील बैलगाडी शर्यतीच्या मैदानावर ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रोहित संजय ढोले असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याची हत्या केल्यानंतर ओळख पटू नये, यासाठी चेहऱ्यावर ॲसिड टाकून विद्रूप करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे नेवाळी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हळदी समारंभासाठी आला अन्

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित संजय ढोले हा नेवाळी गावात एका हळदी समारंभासाठी आला होता. रात्रीच्या सुमारास त्याच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. हा फोन आल्यानंतर तो घरातून बाहेर पडला. मात्र, बराच वेळ होऊनही तो परतला नाही. रात्र उलटून सकाळ झाली तरी रोहित घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

बैलगाडी शर्यतीच्या मैदानावर आढळला मृतदेह

कुटुंबीयांकडून रोहितचा शोध सुरू असतानाच सकाळी नेवाळी येथील बैलगाडी शर्यतीच्या मैदानावर त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या गंभीर खुणा असल्याचे समोर आले. तसेच चेहऱ्यावर ॲसिड टाकल्यामुळे तो विद्रूप झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रोहितची हत्या करून त्याची ओळख लपवण्याचा प्रयत्न झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

Crime News
Crime News : जमिनीच्या वादातून वृद्धाचा मृत्यू? शिंदेंच्या शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल

रात्रीचा फोन ठरणार तपासातील महत्त्वाचा दुवा?

या घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. रोहितला रात्री नेमका कोणाचा फोन आला होता, फोन आल्यानंतर तो कोणाला भेटण्यासाठी घराबाहेर पडला होता आणि त्याच्या हत्येमागे नेमके कारण काय आहे, या प्रश्नांचा पोलीस शोध घेत आहेत.

रोहितच्या संपर्कातील व्यक्ती, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर संभाव्य धागेदोरे तपासले जात आहेत. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. मात्र, हत्येमागील कारण आणि संपूर्ण घटनाक्रम तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

Crime News
Crime News : बेलापूर न्यायालयात धक्कादायक घटना; जन्मठेपेची शिक्षा सुनावताच कैद्याची पाचव्या मजल्यावरून उडी

कर्जत तालुक्यात हत्येच्या घटनेने खळबळ

नेवाळी गावातील बैलगाडी शर्यतीच्या मैदानावर तरुणाचा अशा विद्रूप अवस्थेत मृतदेह आढळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे. रात्री घराबाहेर पडलेल्या रोहितचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला आणि या हत्येमागे कोणाचा हात आहे, याचा उलगडा करण्याचे आव्हान आता कर्जत पोलिसांसमोर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.