Crime News : जमिनीच्या वादातून वृद्धाचा मृत्यू? शिंदेंच्या शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल

Ratnagiri Land Dispute Case News: सामाईक जमिनीच्या वादातून गुहागर तालुक्यात एका वृद्धाला मानसिक त्रास दिल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेतील दोन नेत्यांवर झाला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime News
Crime News Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Ratnagiri News : जमिनीच्या व्यवहारावरून सुरू असलेल्या वादातून एका 66 वर्षीय वृद्धाला मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गुहागर तालुक्यातील चार व्यक्तींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यात शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्यासह गुहागर तालुका सचिवाचा समावेश आहे. या घटनेमुळे गुहागर तालुक्यात खळबळ उडाली असून या प्रकरणाची परिसरात चर्चा सुरू झाली आहे.

पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, गोणवली-कुंभारवाडी येथील यशवंत महादेव कुळे (वय 66) यांचा काही व्यक्तींशी सामाईक जमिनीच्या व्यवहारावरून वाद सुरू होता. संबंधित जमिनीच्या व्यवहारात त्यांच्या नावाचा समावेश करण्यासाठी वारंवार दबाव आणला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या कथित त्रासामुळे यशवंत कुळे मानसिक तणावात होते, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी आरोपींकडून धमकी दिली जात असल्याबाबत चिठ्ठी लिहून ठेवल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 7 नोव्हेंबर 2026 रोजी त्यांनी राहत्या घरी गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.

Crime News
Crime News : शिवसेनेच्या माजी आमदाराच्या भावाचा जुगार अड्डा, पोलिसांनी तीनदा छापा टाकला तरी खेळ सुरूच; 40 जणांवर गुन्हा!

चौघांविरोधात गुन्हा

मृत यशवंत कुळे यांचे पुत्र नरेश यशवंत कुळे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुहागर पोलीस ठाण्यात 21 नोव्हेंबर 2026 रोजी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 108 आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणात पराग कोळवणकर (पडवे), संतोष जैतापकर (नरवण), संतोष आग्रे (तवसाळी) आणि दीपक पालशेतकर (पालशेत) यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. जमिनीच्या व्यवहारातून निर्माण झालेला वाद आणि त्यातून वृद्धाच्या मृत्यूशी संबंधित आरोप यामुळे गुहागर तालुक्यात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून, तपासानंतर या प्रकरणातील पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.

Crime News
Bihar Crime News: राजकीय वर्तुळात खळबळ: काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या कारवर भरदिवसा सहा ते सात राऊंड फायर, चालकामुळे वाचला जीव

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर गुहागर तालुक्यात भाजपचे उत्तर रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यामुळे येथील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण आता त्यांच्यासह गुहागर तालुका सचिव संतोष आग्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.