Shivsena MLA : धरणांचा वाद पेटला? शिंदेंच्या आमदाराचा थेट महायुतीलाच निर्वाणीचा इशारा; 'मुंबईचे पाणी रोखू!'

Mahendra Thorve Warns Mahayuti Government Over karjat Dams : कर्जत तालुक्यातील शिलार आणि पोशीर धरणे उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याला आता स्थानिकांचा विरोध वाढत आहे. या विरोधाला शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पाठिंबा दिला आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde sarkarnama
Published on: 
Updated on: 

karjat News : कर्जत तालुक्यातील शिलार आणि पोशीर धरणे उभारण्याचा निर्णय शासनाने मागे घेतला नाही, तर मुंबईला होणारा पाणीपुरवठा रोखण्याची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला आहे. या प्रस्तावित धरणांमुळे तालुक्यातील ३५ हून अधिक गावांवर विस्थापनाचे संकट ओढवण्याची शक्यता असून, स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी या प्रकल्पांना तीव्र विरोध दर्शवला आहे. “माझ्या मतदारांचा विरोध, तोच माझा विरोध,” अशी ठाम भूमिका थोरवे यांनी मांडली.

कर्जत तालुक्यातील चिल्लार नदीवर शिलार, तर पोश्री नदीवर पोशीर धरण उभारण्याचा प्रस्ताव शासनाने जाहीर केला आहे. या दोन्ही प्रकल्पांना स्थानिक पातळीवर जोरदार विरोध होत असून, शेतकरी आणि ग्रामस्थांनी मोर्चा काढून आपली नाराजी व्यक्त केली आहे. प्रस्तावित धरणांमुळे शेती, रोजगार आणि गावांच्या अस्तित्वावर परिणाम होण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

या प्रकल्पांबाबत शासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप आमदार थोरवे यांनी केला. शिलार आणि पोशीर धरणांसाठी थेट निविदा काढण्यात आल्या; मात्र लोकप्रतिनिधींना साधी विचारणाही करण्यात आली नाही, असे त्यांनी सांगितले. शासनाने स्थानिक जनतेला गृहीत धरू नये. गरज पडल्यास या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Eknath Shinde
Shivsena MLA Dream Project : एकनाथ शिंदेंच्या आमदाराच्या ड्रीम प्रोजेक्टला उद्योगमंत्र्यांचाच ब्रेक, यड्रावकरांच्या सैनिक टाकळी एमआयडीसी प्रकल्पाला तात्पुरती स्थगिती

कोयना प्रकल्पग्रस्तांचे उदाहरण

सुमारे ५० वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यात कोयना धरण बांधण्यात आले. या प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या २२ गावांतील प्रकल्पग्रस्त आजही कर्जत आणि खालापूर मतदारसंघात राहत असल्याचे थोरवे यांनी नमूद केले. अनेक वर्षांनंतरही या प्रकल्पग्रस्तांना पुरेशा सुविधा मिळालेल्या नसल्याचा दावा त्यांनी केला.

कोयना प्रकल्पग्रस्तांची परिस्थिती पाहता कर्जत तालुक्यात आणखी दोन धरणे उभारल्यास ३५ हून अधिक गावांतील नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांची शेती आणि रोजगार उद्ध्वस्त होण्याची शक्यता असल्याने शिलार आणि पोशीर धरणांना आपला ठाम विरोध असल्याचे थोरवे यांनी स्पष्ट केले.

धरणे रद्द करण्याची मागणी

शिलार आणि पोशीर हे दोन्ही धरण प्रकल्प रद्द करावेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे करण्यात आल्याचे आमदार थोरवे यांनी सांगितले. या मागणीला शासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, अशी त्यांची भूमिका आहे.

Eknath Shinde
Shivsena MLA Viral Video : 'हिंमत दाखवा! खुलासा करा', शिंदेच्या आमदारांचा टक्केवारी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतेज पाटलांनी मागणीच केली

सरकारला जाब विचारणार

शासनाने शिलार आणि पोशीर धरणे कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला नाही, तर आगामी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून सरकारला जाब विचारणार असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्ट केले. स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता धरणांचे प्रकल्प पुढे रेटल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com