Raju Shetti Protest : राजू शेट्टींचे आंदोलन तूर्तास स्थगित, मात्र सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम; कोकणातील बागायतदारांना नुकसान भरपाई द्या अन्यथा...

konkan mango cashew farmers compensation protest : जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांचे विविध प्रश्‍न आणि मागण्यांच्या पूर्ततेसाठी नांदगाव येथे गोवा-मुंबई महामार्गावर आंदोलन छेडण्यात आले होते.
konkan mango cashew farmers compensation protest; raju shetti protest
konkan mango cashew farmers compensation protest; raju shetti protestsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. आंबा आणि काजू बागायतदारांसाठी मोठ्या नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

  2. सरकारने दोन दिवसांत निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.

  3. मागणी पूर्ण न झाल्यास वर्षा बंगल्यावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Kankavli News : कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या नुकसान भरपाईबाबत पुकारण्यात आलेले आंदोलन शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी तूर्तास स्थगित केले आहे. तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आंबा आणि काजू बागायतदारांना येत्या दोन दिवसात अधिवेशन संपण्यापूर्वी नुकसान भरपाई जाहीर केली जाईल असे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी राजू शेट्टी यांनी पण जर येत्या दोन दिवसात अधिवेशन संपण्यापूर्वी विधिमंडळात तशी घोषणा झाली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर धडक देवू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. तर या आंदोलनातून आंबा बागायतदारांसाठी हेक्टरी ५ लाख तर काजूला हेक्टरी ३ लाख नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

मुंबई गोवा महामार्गावर आंबा बागायतदारांकडून दुसऱ्या टप्प्यात सोमवारी (ता.२३) असलदे पेट्रोल पंप येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच असलदे ते नांदगाव, पाटीलवाडीपर्यंत राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात लाँग मार्च काढण्यात आला. यावेळी यावेळी माजी आमदार वैभव नाईक, आंबा उत्पादक संघाचे जिल्हाध्यक्ष काका ढोके, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यासह कोकणातील नगदी पीक म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा आणि काजू पीक निसर्गाच्या असमतोलपणामुळे अडचणीत सापडले आहे. त्यासाठी यामुळे बागायतदार शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. तर सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली. पण या मागणीवर आधी कोणतीच प्रतिक्रिया शासनाकडून आली नाही.

konkan mango cashew farmers compensation protest; raju shetti protest
raju shetti : ZP च्या तोंडावर राजू शेट्टींच्या खंद्या समर्थकाचा भाजपात प्रवेश! सांगलीत चंद्रकांतदादांचा राजकीय भूकंप

पण दहा दिवसांच्या आधी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात ओरोस येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी पालकमंत्री नीतेश राणे यांनी हा प्रश्न विधीमंडळात मांडू असे म्हटले होते. तर शेट्टी यांनी आंबा आणि काजू बागायतदारांचे विविध प्रश्‍न आणि मागण्यांची पूर्तता न झाल्यास २३ मार्चला नांदगाव येथे मुंबई गोवा महामार्गावर आंदोलन छेडण्याचा निर्धार बोलून दाखवला होता.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्यावतीने देत आंबा, काजू बागायतदारांना त्यांच्यामागण्यांबाबत लेखी आश्वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी आंबा आणि काजू बागायतदारांना येत्या दोन दिवसात अधिवेशन संपण्यापूर्वी विधिमंडळात नुकसान भरपाई जाहीर केली जाईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले. यामुळे हे आंदोलन दोन दिवसांसाठी तूर्तास स्थगित केल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केलीय. तसेच दिलेले आश्वासनासाठी दोन दिवस थांबू अन्यथा नाहीतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर धडक देवू असा इशारा दिला आहे.

यावेळी शेट्टी म्हणाले, हे आंदोलन दोन दिवसांसाठी तूर्तास स्थगित करू. विधिमंडळाच्या अधिवेशनात कोणताच निर्णय न झाल्यास पुढील दोन दिवसांत पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांची बैठक घेऊ आणि पुढील आंदोलनाचा निर्णय घेऊ. तर हे आंदोलन आम्ही मुंबई येथील वर्षा बंगल्यावर करू. तर या आंदोलनामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्गसह ठाणे, रायगड व पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सहभाग असेल असाही इशारा त्यांनी दिला आहे.

konkan mango cashew farmers compensation protest; raju shetti protest
Raju Shetti :...तरच मुरलीधर मोहोळ यांच्या बाबतचे गैरसमज दूर होतील', राजू शेट्टी जैन बोर्डिंगवरून पुन्हा भिडणार

FAQs :

1. शेतकरी कोणती मागणी करत आहेत?
आंब्यासाठी हेक्टरी 5 लाख आणि काजूसाठी 3 लाख नुकसान भरपाई.

2. आंदोलन का स्थगित करण्यात आले?
सरकारने दोन दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे.

3. आंदोलनाचे नेतृत्व कोण करत आहेत?
राजू शेट्टी हे आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.

4. सरकारने काय आश्वासन दिले आहे?
विधिमंडळात नुकसान भरपाई जाहीर करण्याचे लेखी आश्वासन.

5. मागणी पूर्ण न झाल्यास काय होईल?
शेतकरी वर्षा बंगल्यावर मोर्चा काढतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com