सरपंचांनी सोमय्यांना पाडलं तोंडावर; दावा केलेल्या जागेचं सांगितलं वास्तव

Kirit Somaiya| Sanjay Raut| Rashmi Thackeray त्या जागी बंगले नसतानाही रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी घरपट्टी भरली
Kirit Somaiya
Kirit Somaiya
Published on
Updated on

रायगड : भाजप नेते नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या (Rashmi Thackeray) नावावर अलिबागमध्ये 19 बंगले असल्याचा दावा केला. १२ नोव्हेंबर २०२० ला या १९ बंगल्यांचा मालमत्ता कर कोर्लाई ग्रामपंचायतला भरला. या बंगल्यांवरुन आता संजय राऊत विरुद्ध किरीट सोमय्या वाद चांगलाच रंगला आहे. या संदर्भात नेमकं वास्तव काय? याची चर्चा सुरू झालेली असताना खुद्द कोर्लाई (Korlai Gaon) गावचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी एका वाहिनीशी बोलताना यावर खुलासा केला आहे.

सरपंच प्रशांत मिसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, २००९ मध्ये अन्वय नाईक यांनी आमच्याकडे रिसॉर्ट बांधण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यावेळी त्यांनी काही कच्ची घरेही बांधली मात्र, नंतर त्यांना रिसॉर्टसाठी परवानगी मिळाली नाही. त्यामुळे त्या जागेवर असलेली 10-12 घरेही तोडून तेथे झाडे लावण्यात आली.

Kirit Somaiya
राऊत, तुम्ही कोणाला जोड्याने मारणार ; रश्मी ठाकरेंनी १९ बंगल्यांचा कर भरलायं

2014 मध्ये अन्वय नाईक यांनी ही जागा रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांना कायदेशीररित्या विकली. 2015 ते 2019 या काळात त्यांच्यापैकी कोणीही इकडे आले नाही. त्यामुळे 2019 मध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना नोटीस पाठवण्यात आली. ज्यात 2014 पासून ते 2019 पर्यंतची घरपट्टीची थकबाकी भरण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी आरटीजीएस द्वारे 2019 ला ही घरपट्टी भरली.

रश्मी ठाकरे यांनी घरपट्टी भरल्यानंतर त्याठिकाणी गेलो, तेव्हा तेथे अशा प्रकारचं कुठलंही घर नसल्याचं आम्ही पाहिलं. जी घरे तिथे नव्हती, त्या घरांची त्यांच्याकडून कर आकारणी करण्यात आली. त्यासंदर्भात माहिती घेतल्यानंतर 2013-14 ला ही घरी तोडून तेथे झाडे लावण्यात आली. 2019 ला 11 घरे त्यांनी नावावर केली. ग्रामपंचातीने 2021पर्यंत कर घेतला. हे आमच्या लक्षात आल्यावर आम्ही प्रत्यक्षात जागेवर जाऊन वस्तूस्थितीची पाहणी केली आणि तेथे घर न आढळल्याने ती घरे आम्ही रद्द केली असंही कोलराईचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी सांगितलं. विशेष म्हणजे या जागी बंगले नसून गुरांचा गोठा, पंप शेड, नारळीची झाडे, विहीर, पाण्याच्या टाक्या, साठवण तलाव असल्याचे आढळून आले. तसेच, रश्मी ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारचा माफीनामा मागितला नसल्याचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी स्पष्ट केलं.

Kirit Somaiya
पवारांनी विचारले; दोघेही राजकारण करता, तर मग घर कोण सांभाळतं?

“ठाकरे कुटुंबापैकी आजपर्यंत कोणीही आमच्याशी संपर्क साधला नाही. त्यांनी कधीही ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप केला नाही. ग्रामपंचायतीने जे केलं ते कायदेशीर रित्या केलं. रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी 2021 घरपट्टी भरली. पण प्रत्यक्षात ही घरं प्रत्यक्षात अस्तित्वात नसुन केवळ कागदोपत्री आहेत. हे लक्षात आल्यानंतर मात्र नंतर त्यांनी आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहणी करून घरपट्टी रद्द केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com