Bribery Case : लाचखोरीचा धक्कादायक प्रकार : NOC साठी चांदीची अंगठी मागणाऱ्या अधिकाऱ्यावर नगरपंचायतीतच कारवाई

Anti Corruption Bureau Caught Kudal Nagar Panchayat Officer Over Bribery Case : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात महिन्याभरात दोन कारवाया करत महसूल विभागाला धक्के दिले होते. याची राज्यभर जोरदार चर्चा झाली.
Bribery Case
Bribery CaseSarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg Crime News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रत्नागिरी जिल्ह्यात केलेल्या दोन कारवायांची राज्यभर चर्चा सुरू असताना, शेजारील जिल्ह्यातदेखील एसीबीने मोठी कारवाई केली आहे. थेट नगरपंचायतीत कारवाई केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, स्वच्छता निरीक्षकाला ताब्यात घेतले आहे. तर या कारवाईत लाच मागण्याचा नवा प्रकार समोर आला असून, पैसे न घेता अधिकाऱ्याने दागिना मागितल्याचे समोर आले आहे. तर तो घेताना त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले. धक्कादायक म्हणजे कारवाई होणार याची कुणकुण लागताच पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला; मात्र, त्याचा हा प्रयत्न अँथ्रोसिन पावडरमुळे फसला आणि तो एसीबीच्या जाळ्यात अडकला.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदाराने व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला ‘ना हरकत दाखला’ मागणीचा अर्ज नगरपंचायतीत केला होता. ‘पदमगड ज्वेलर्स’ या नावाने तो व्यवसाय सुरू करणार होता.

पण हा दाखला देण्याच्या मोबदल्यात स्वच्छता निरीक्षक पांडुरंग वासुदेव नाटेकर (वर्ग ३) याने लाच मागितली. त्याने पैसे न मागता १,२०० रुपये किमतीची नवीन खडा असलेली चांदीची अंगठी मागितली होती. लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने नाटेकर याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर २७ ऑगस्टला पंचांसमक्ष केलेल्या पडताळणीत संशयित नाटेकर यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

Bribery Case
Corruption Case : भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर सव्वादोनशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राम खाडे न्यायालयात जाणार!

ज्यानंतर संशयिताला पकडण्यासाठी एसीबीने शुक्रवारी (ता. ४) नगरपंचायत कार्यालयात दुपारी अडीचच्या दरम्यान सापळा रचला. पण तक्रारदारच कार्यालयात गेल्यानंतर नाटेकरला याचा संशय आला आणि त्याने तक्रारदाराला प्रतिसाद देणे थांबवले. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या शिताफीच्या प्रयत्नानंतर त्याला पकडण्यात यश मिळाले. संशयिताला वस्तू देताच इशारा करण्याची सूचना दिली होती. ते संकेत मिळताच पथकाने नाटेकरला ताब्यात घेतले.

अँथ्रोसिन पावडरमुळे कारवाईस बळ

मात्र, नाटेकरने लाचप्रकरणी स्वतःला वाचवण्यासाठी अंगठी लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या हातावर अँथ्रोसिन पावडर स्पष्ट दिसून आल्याने पथकाने त्याला तत्काळ ताब्यात घेतले. संशयित नाटेकर याच्यावर कुडाळ पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

Bribery Case
Corruption Case : अवघ्या 15 हजारांसाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी आपली 'खुर्ची'च लावली पणाला, ऑडिओ क्लिप व्हायरल; प्रशासनात उडाली खळबळ

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग उपअधीक्षक संगीता पाटील, पोलिस निरीक्षक दीपक माळी आणि त्यांच्या पथकाने केली. शासकीय कामासाठी कोणत्याही लोकसेवकाने लाच मागितल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com