Wadettiwar Vs Aatram : वडेट्टीवारांनी धर्मरावबाबांचं चॅलेंज तर स्वीकारलंच शिवाय दमही भरला, म्हणाले...

Loksabha Election 2024 News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी वडेट्टीवारांबाबत केलेल्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
Vijay Wadettiwar,Dharmaraobaba Atram
Vijay Wadettiwar,Dharmaraobaba Atramsarkarnama

Vijay Wadettiwar News : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी केलेल्या दाव्यामुळे ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार की काय अशी चर्चा जोर धरू लागली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे लवकरच भाजपमध्ये (bjp) प्रवेश करणार असल्याचं खळबळजनक विधान आत्राम यांनी केले आहे. पण आता वडेट्टीवार यांनी आत्राम यांचा दावा खोडून काढतानाच त्यांना चांगलाच दम भरला आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचं चॅलेंज स्वीकारतानाच माझ्यावर नाहक आरोप केले जात आहेत. या प्रकरणी नार्को टेस्ट केली जावी. माझी तयारी आहे. माझी, चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule आणि धर्मरावबाबा अशा आम्हा तिघांचीही नार्को टेस्ट करावी, असं ते म्हणाले होते. मी मोठ्या पदावर असताना दुसऱ्या पक्षात जाईल का? हे सत्तेचा उपभोग घ्यायला गेले. आता त्यांच्यामागे दलित, ओबीसी समाज राहिलेला नसून आदिवासी समाजही त्यांच्यावर नाराज असल्याची प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली.

Vijay Wadettiwar,Dharmaraobaba Atram
Pankaja Munde News : पंकजा मुंडे म्हणाल्या, '... तर तुमचं 'ते' कर्ज मी व्याजासकट परत करेन !'

वडेट्टीवार धर्मरावबाबा आत्राम Dharmarao Baba Aatram यांनी दिलेली माहिती चुकीची आहे. धर्मरावबाबांनी आरोप सिद्ध करावेत, कोणत्या हॉटेलमध्ये बैठक झाली, याचा खुलासा करावा, असे प्रतिआव्हान वडेट्टीवार यांनी दिले होते. या आव्हानाला आज धर्मरावबाबा आत्राम यांनी उत्तर दिले आहे. तसेच मला लोकांनी निवडून दिलं असून, माझ्याशी पंगा घेतला तर जशास तसे उत्तर देईन. माझ्यावर वैयक्तिक आरोप केले तर मी पण वैयक्तिक खुलासे करेन, असा सज्जड दमच वडेट्टीवारांनी आत्राम यांना भरला आहे.

विजय वडेट्टीवारांनी Vijay Wadettiwar आत्राम यांचा विमाळतळावरील बैठकांचा दावाही खोडून काढला आहे. ते म्हणाले, विमानतळावर अशा कुठे पक्षाच्या बैठका होतात का? मला वाटलं काही गौप्यस्फोट करणार असं वाटलं होतं. एअरपोर्टल VIP लाउंजमध्ये बैठक झाली,असं आत्राम यांनी सांगितले आहे. पण अशा बैठका विमानतळावर होतात का? आरोप करताना थोडं तरी भान ठेवलं पाहिजे. बावनकुळे यांनी स्वत: खुलासा केला आहे. अशा काही चर्चा नाही, प्रस्ताव नाही, असंही बावनकुळे यांनी स्पष्टपणे सांगितल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ते म्हणाले, मुंबईच्या विमानतळावर टर्मिनल एकमध्ये त्या वेळचे मंत्री असलेले विजय वडेट्टीवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माझ्या उपस्थितीत आमची बैठक झाली. यामध्ये वडेट्टीवार भाजपमध्ये प्रवेश करण्यावर चर्चा झाली. हे खोटं असेल तर विजय वडेट्टीवार आणि माझी ही एकत्र नार्को टेस्ट करा," असे आत्राम म्हणाले.

तसेच या बैठकीसंदर्भात अधिक माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देतील. 4 जूननंतर वडेट्टीवार भाजपमध्ये प्रवेश करतील हे खरं आहे, असे आत्राम यांनी म्हटले आहे.

R

Vijay Wadettiwar,Dharmaraobaba Atram
PM Modi : PM झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच 'RSS'च्या भूमीत मुक्कामी ! काय आहे कारण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com