Teacher Crime : महाराष्ट्रात आता मुलंही असुरक्षित, शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; क्लासच्या खोलीत नेलं अन्...

Raigad Tuition Teacher Crime Case : रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत महिला आणि बाल अत्याचाराची दुसरी घटना असून आता शैक्षणिक क्षेत्रात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Raigad Teacher Crime Case
Raigad Teacher Crime Casesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. महाड येथील खासगी क्लास शिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थ्याच्या तक्रारीनुसार पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

  2. 2024-25 शैक्षणिक वर्षात घडलेल्या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू

  3. या प्रकरणामुळे रायगड जिल्ह्यात संतापाचे वातावरण असून कठोर कारवाईची मागणी

Raigad News : रायगड जिल्हा भोंदूबाबा बाबाजनच्या काळ्या कारनाम्यामुळे बदनाम झाला असतानाच आता माणुसकीसह गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका नामवंत खासगी शिकवणीच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यामुळे येथे आता संतापाची लाट उसळली असून अश्लील चाळे करत लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तर त्याच्याविरोधात पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. दरम्यान आता आरोपीला कठोर कारवाई व्हावी अशी मागणी पालकांकडून केली जात असून सध्या जिल्ह्यात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाड येथील एका नामवंत खासगी शिकवणीत ही धक्कादायक घटना घडली असून शिकवणाचा मालकानेच हे भायनक कृत्य केलं आहे. तर सुनील गांधीवर असे त्याचे नाव असून त्याने इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होत आहे. याबाबत पीडित विद्यार्थ्यानेच गंभीर आरोप केले असून जिल्ह्यात माणुसकीला आणि गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडल्याचे बोलले जात आहे. आता या प्रकरणाचा तपास पोलिस करत असून त्यांनी दुष्कृत्य करणाऱ्या सुनील गांधीवर यास ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुनील गांधीवर हे महाड येथे नामवंत खासगी शिकवणी चालवतात. येथे 2024-25 या शैक्षणिक वर्षादरम्यान त्याने खासगी शिकणी घेत 2024-25 या शैक्षणिक वर्षादरम्यान पीडित विद्यार्थ्याला क्लासच्या वरील बाजूस असलेल्या बेडरूममध्ये नेले. तेथे विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे करत त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला.

या घटनेनंतर आता मालक आणि शिक्षक सुनील गांधीवर याच्याविरोधात पालकांत संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. तर या प्रकरणामुळे जिल्ह्यात माणुसकीला आणि गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासली गेली आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

भोंदूबाबा प्रकरण

राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच येथेही भोंदूबाबा बाबाजान याचा भांडा फोड झाला. त्याने जादूटोण्याच्या बाहाण्याने अनेक महिलांवर अधोरी पूजा करत 'विकृत कांड' केल्याचे उघड झाले आहे. यानंतर आता रायगडमध्ये खळबळ उडाली असनाताच आता महिला आणि बाल अत्याचाराची गेल्या 24 तासांत ही दुसरी घटना घडली आहे. ही बाब रायगड जिल्ह्यासाठी चिंतेची ठरत असून आता शैक्षणिक क्षेत्रही हादरले आहे. या घटनेमुळे आता पालकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

FAQs :

1. ही घटना कुठे घडली आहे?
ही घटना रायगड जिल्ह्यातील महाड येथील खासगी शिकवणी क्लासमध्ये घडली आहे

2. आरोपीवर कोणत्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे?
आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

3. तक्रार कोणी केली आहे?
इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने तक्रार केली आहे

4. पोलिसांची पुढील कारवाई काय आहे?
पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे

5. समाजात या घटनेबाबत काय प्रतिक्रिया आहे?
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com