पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
शांततेत पार पडलेल्या मतदानानंतर निकालात भाजपच्या विजयाची सुनामी दिसून आली.
या निकालामुळे पनवेलमध्ये भाजपची सत्ता भक्कम झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Panvel Municipal Corporation Election Results 2026 : पनवेल पालिकेच्या निवडणुकीचे मतदान पार पडले असून आज (ता.१६) मतपेटीत बंद झालेले उमेदवारांचे भविष्य समोर आले आहे. काही तुरळक प्रकार किंवा किरकोळ वाद वगळता, शांततेत मतदान पार पडले असून 64 जागांवर भाजप प्रणित महायुतीने विजय मिळवला आहे. विशेष बाब म्हणजे, निवडणुकीआधीच भाजपचे 6 आणि अपक्ष 1 असे 7 उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने भाजपचे आधीच पारडे जड झाले आहे.
रायगड जिल्ह्यातील एकमेव असणाऱ्या पनवेल महानगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. महापालिकेच्या 20 प्रभागांमध्ये 78 जागांसाठी गुरूवारी (15 जानेवारीला) मतदान झाले. यंदा महापालिकेच्या निवडणुकीत 286 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
मुंबईपासून जवळ असणारी ही महापालिका असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व आले आहे. ही निवडणूक भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत प्रतिष्ठेची झाली असून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार, आमदार यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती.
आता या निवडणुकीत भाजपचे 6 उमेदवार निकालाच्या आधीच बिनविरोध झाले असून आज लागणाऱ्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या निकालात आता उर्वरित जागांवरील निकाल लागला असून 64 जागांवर भाजप प्रणित महायुतीने विजय मिळवला आहे. तसेच महाविकास आघाडीने 14 जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा पनवेल महानगरपालिकेवर भाजप प्रणित महायुतीने बाजी मारल्याचे दिसत आहे.
यादरम्यान आता भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत विजयी उमेदवारांनी यावेळी जल्लोष साजरा केला. यावेळी विजयी उमेदवार यान प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी ठाकूर यांनी या विजयाचे श्रेय भाजपच्या वरीष्ठ नेत्यांना दिले असून अशीच आघाडी आगामी काळातही राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर आता महानगरपालिकेच्या विजयामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपचे बळ वाढले आहे.
1. पनवेल महापालिकेत कोणाला बहुमत मिळाले?
भाजपप्रणित महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
2. पनवेल निवडणुकीत भाजपचा विजय किती मोठा आहे?
हा विजय ‘विजयाची सुनामी’ म्हणून ओळखला जात असून भाजपने निर्णायक आघाडी घेतली आहे.
3. मतदान कसे पार पडले होते?
काही किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले.
4. या निकालाचा राजकीय परिणाम काय होईल?
पनवेलमध्ये भाजपचे स्थान अधिक मजबूत होऊन विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.
5. पुढील टप्प्यात काय होणार आहे?
महापालिकेतील महापौर व स्थायी समितीच्या निवडीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.