Panvel Municipal Corporation
पनवेल ही रायगड जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका आहे. नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाल्यानंतर 2017 मध्ये पहिली निवडणूक झाली. यात 78 पैकी 51 जागांवर विजय मिळवत भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले होते. त्याचवेळी शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस यांच्या महाआघाडीला अवघ्या 27 जागांवर विजय मिळवता आला होता. शिवसेनेने भोपळाही फोडला नव्हता. यंदा भाजप विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत होणार आहे.