Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांचा पारा ठणकलाच! विरोधी पक्षनेतेपदावर प्रश्न विचारताच पत्रकारांवरच भडकले? म्हणाले...
नागपूर अधिवेशन सुरू असून विधान परिषद व विधानसभेत विरोधी पक्षनेते पद अजूनही रिक्त आहे.
भास्कर जाधव आणि सतेज पाटील यांची नावं रेसमध्ये असली तरी दोघेही मागे पडल्याची चर्चा आहे.
विरोधी नेतेपदाबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारताच भास्कर जाधव संतापले आणि वातावरण तापले.
Ratnagiri News : विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनाला सुरुवात झाली असून यंदा देखील विधान परिषद आणि विधानसभेत विरोधी पक्षनेते रिक्त आहे. यावरून भास्कर जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांच्यासह सतेज पाटील यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी स्पर्धेत असणारे आता मागे पडले आहे. यावरून भास्कर जाधव आणखी आक्रमक झाले असून ते ठाकरेंना सोडून 10 आमदारांसह भाजपमध्ये प्रेवश करतील चर्चा आता सुरू झाली आहे. यादरम्यान त्यांना विरोधी पक्षनेतेपदावर प्रश्न विचारताच त्यांचा पारा चढला आणि ते पत्रकारांवरच भडकल्याचे दिसून आले आहे.
गेल्या वर्षभरापासून विधानसभेचे विरोधीपक्षनेते पद रिक्त असून आता नुकताच अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले आहे. अशावेळी भाजपने मोठी खेळी खेळत महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा डाव यशस्वी केल्याचे दिसून येत आहे.
भाजपने काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांना विधानसभेचे तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद देण्याची तयारी दाखवल्याची माहिती आहे. पण याआधी भास्कर जाधव यांना विधानसभा आणि सतेज पाटील यांचा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी नियुक्ती करावी अशी आग्रही मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती. तसे पत्र देखील देण्यात आले होते. मात्र,आता या दोघांच्या नावाला भाजपने विरोध केल्याचे दिसत आहे.
यावरूनच भास्कर जाधव नाराज झाल्याचे दिसून येत असून त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारताच ते चांगलेच भडकले. त्यांना पत्रकारांनी, भाजपने काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांना विधानसभेचे तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद देण्याची तयारी दाखवल्याची चर्चा आहे. वडेट्टीवार यांना तुमचा त्यांना पाठिंबा असेल का? असा सवाल केला होता.
या प्रश्नावर भास्कर जाधव यांनी, तुम्ही देणार आहात का? तुमच्या हातात आहे का? तुमच्या हातात असेल तर सांगा... धन्यवाद म्हणत त्यांनी पत्रकारांच्या पुढच्या प्रश्नांना उत्तरे न देता तेथून जाणे पसंद केले आहे. यावरून आता भाजपच्या खेळीसह भास्कर जाधवांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे.
भाजपची नेमकी खेळी काय?
महाविकास आघाडीने भास्कर जाधव यांना विधानसभा आणि सतेज पाटील यांचा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी नियुक्ती करावी अशी आग्रही मागणी केली होती. तसेच पत्र देखील अध्यक्षांना दिले होते. मात्र भाजपने महाविकास आघाडीत फूट पाडण्यासाठी भास्कर जाधवांच्या नावाला विरोध केला आहे.
तसेच सतेज पाटलांच्या नावा ऐवजी अनिल परब यांच्या नावावर पसंती दिली आहे. यामुळे आता भाजपच्या नेत्यांच्या मनात नेमकं काय आहे असा सवाल आता केला जात आहे. तर भास्कर जाधवांच्या नावाला शिंदेच्या शिवसेनेविरोध केल्याची माहिती समोर येत असून विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते झाले तर टीकेचा फोकस महायुतीतील तिन्ही पक्षांवर असेल. त्यांचे मुख्य लक्ष्य हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील असा तर्कही शिंदेंच्या शिवसेनेनं व्यक्त केला आहे.
FAQs :
1. विरोधी पक्षनेते पद रिक्त का आहे?
विरोधी पक्षांमध्ये एकमत नसल्यामुळे नियुक्ती पुढे ढकलली गेली आहे.
2. भास्कर जाधव संतापले का?
विरोधी पक्षनेतेपदाबाबत सातत्याने प्रश्न विचारल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
3. सतेज पाटील रेसमधून बाहेर कसे पडले?
पक्षातील आंतरिक स्तरावरील चर्चेमुळे त्यांचे नाव मागे पडल्याचे सांगितले जाते.
4. नागपूर अधिवेशनात हा मुद्दा मोठा का ठरला?
विधिमंडळाचे महत्त्वाचे अधिवेशन असून विरोधी पक्षाचा नेता नसल्याने चर्चेला उधाण आले आहे.
5. पुढील विरोधी पक्षनेते कोण होणार?
अद्याप अधिकृत घोषणा नाही; चर्चा सुरू असल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

