

राज्यात वाढत असलेल्या बेपत्ता लहान मुलांच्या संख्येबाबत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर आधीच आकडेवारी मांडली असून आवश्यक असल्यास पुढील उत्तर दिले जाईल, असे स्पष्ट केले.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बेपत्ता मुलांच्या शोधासाठी विशेष मोहिमा राबवल्या जात असल्याचे सांगितले.
Nagpur/Ratnagiri News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात बेपत्ता होणाऱ्या लहान मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले होते. ज्यात त्यांनी, लहान मुलं पळवण्याऱ्या टोळ्यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. तसेच त्यांनी या प्रश्नावर विधीमंडळात चर्चा व्हावी अशी मागणी केली होती. ज्यानंतर आता फडणवीस यांच्यासह गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राज ठाकरे यांच्या या पत्राला उत्तर दिलं आहे. फडणवीस यांनी, सरकारने याबाबत सविस्तर आकडेवारी मांडली असून त्यांची काही शंका असेल तर त्यावर नक्की उत्तर दिलं जाईल’, असे म्हटलं आहे. तर कदम यांनी, जेव्हा लहान मुलं हरवतात किंवा बेपत्ता होतात तेव्हा त्यांचा तपास घेण्यासाठी सरकार विशेष मोहीम राबवतो. तरीही हा विषय गंभीर असल्याचे म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी राज्यात बेपत्ता होणाऱ्या लहान मुलांच्या वाढत्या संख्येसह लहान मुलं पळवण्याऱ्या टोळ्यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी याबाबत फडणवीस यांना पत्र लिहत या मुद्द्यात राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने लक्ष घालावे. या विषयावर अधिवेशनात चर्चाही घडवून आणावी अशी मागणी केली होती. फक्त चर्चाच करू नये तर ठोस कृती करावी, असेही म्हटलं होते.
तसेच राज ठाकरे यांनी रस्त्यावर, स्टेशनवर आणि बसस्टँडवर लहान मुलांना घेवून भीक मागणारी माणसं ही खरंच त्यांचे आई-वडील असतात का? याचाही तपास व्हावा. त्यासाठी डीएनए टेस्टही करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही? असा सवाल केला होता. याची पोस्टही आता व्हायरल होत आहे.
फडणवीस यांची प्रतिक्रिया
यानंतरच आता फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, राज ठाकरे यांनी पाठवलेलं पत्र अद्याप वाचलेलं नाही. मात्र, बेपत्ता होणाऱ्या मुली किंवा मुलांच्या संदर्भात सरकारने माहिती पटलावर ठेवली आहे. त्याची आकडेवारी आणि कारणेही स्पष्ट केलेली आहेत. तर यातील परत किती येतात हे देखील सांगितलं आहे.
पण मुद्दा हाच आहे की एखादी मुलगी घरी भांडण करून गेली ती परत आलीही. पण आपण तक्रारही बेपत्ता म्हणूनच देतो. त्यामुळेच अशा तक्रारींची संख्या जास्त दिसते. सध्या आकडा जरी मोठा दिसत असला तरीही ९० टक्क्यांपेक्षा बेपत्ता मुलं सरकार परतं आणतं. तर पुढच्या वर्ष दीडं वर्षात राहिलेले परत येतात किंवा सापडतात. पण तरी देखील जर त्यांच्या काही शंका असतील तर मी त्यावर नक्कीच उत्तर देऊ, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
गृहराज्यमंत्री कदम म्हणतात...
राज ठाकरे यांच्या पत्राबद्दल मला माहिती नाही. पण लहान मुले अचानक हरवण्याच्या काही बातम्या आम्ही देखील पाहिल्या आहेत. जेव्हा लहान मुलं हरवतात, तेव्हा त्यांचा तपास करण्यासाठी सरकार विशेष तपास योजना राबवते. या विशेष मोहिमांच्या दरम्यान ज्यांनी तक्रार नसते असेही मुलांचा शोध लागतो. तसेच अशी घटनांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त मुलांचा शोध लागलेला आहे.
यातील काही मुले हे स्वत:हून निघून गेलेली असतात, किंवा आणखी काही वेगळ्या कारणांनी. मात्र याचा अर्थ असे नाही की सरकार उरलेल्या १० टक्के मुलांना शोधत नाही. त्यांच्या शोधासाठी विशेष मोहीम आम्ही राबवतोय. याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गांभीर दखल घेतली आहे. त्यांचे याकडे लक्ष आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील देण्यात आल्या असून हा विषय नक्कीच गंभीर असल्याचे कदम यांनी म्हटलं आहे.
काय म्हटंल आहे राज ठाकरे यांनी...
राज ठाकरे यांनी, महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण २०२१ ते २०२४ या काळात जवळपास ३०% नी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नसल्याचे म्हटलं आहे.
1. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र का लिहिले?
राज्यात बेपत्ता होणाऱ्या लहान मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करण्यासाठी.
2. देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिले?
या विषयावर आधीच सविस्तर आकडेवारी मांडली असून, उर्वरित शंकांवर उत्तर दिले जाईल असे त्यांनी सांगितले.
3. या मुद्द्यावर विधीमंडळात चर्चा होणार का?
राज ठाकरे यांनी मागणी केली असून सरकारकडून त्यावर सकारात्मक विचार केला जात आहे.
4. योगेश कदम यांनी काय माहिती दिली?
लहान मुले बेपत्ता झाल्यास त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाते.
5. हा मुद्दा गंभीर का मानला जात आहे?
लहान मुलांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित असल्याने हा विषय अत्यंत गंभीर आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.