Illegal Mining : अवैध खाणींना दणका, महसूलमंत्र्यांनी केली विधानसभेत बंदची घोषणा; मालकांसह तहसीलदार-प्रांताधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

Chandrashekhar Bawankule environment issue: सरकारच्यावतीने याबाबत भूमिका मांडताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी कठोर कारवाईचे संकेत दिले.
Illegal Mining
Illegal MiningSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. अवैध खाणकामामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचा मुद्दा विधानसभेत गाजला.

  2. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले.

  3. पालघर, ठाणे आणि रायगडमधील अवैध खाणी बंद करण्याचे आदेश दिले जाणार आहेत.

assembly session : राज्यात अवैध खाणकामांमुळे होणाऱ्या पर्यावरण ऱ्हासचा मुद्दा विधानसभेतही गाजला. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशा अवैध खाणींविरोधात सरकारची भूमिका असल्याचे सांगत कठोर कारवाईचे संकेत दिले.

कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यातील अवैध खाणी बंद करण्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे. तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्यासह तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील अवैध खाण मालकांचे धाबे दणाणले आहेत.

राज्यातील अवैध खाणकामांचा मुद्दा विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू यांनी उपस्थित केला होता. तसेच ठाणे, रायगड, पालघरमधील अवैध खाणींचा मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला होता.

Illegal Mining
Chandrashekhar Bawankule : आधी तावडे, आता बावनकुळेंनी करून दाखवलं! संसदेत वाढविली भाजपची ताकद, ‘ती’ खेळी यशस्वी...

तसेच अशा अवैध खाणकामांमुळे सरकारचा महसूल मोठ्याप्रमाणात बुडत असून अवैध खाणकामांना मदत करणाऱ्या तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्यावर कारवाई होणार का असाही सवाल केला होता. तर सरकारने अशा तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशीही मागणी केली होती.

यावर उत्तर देताना बावनकुळे यांनी अशा अवैध खाणींविरोधात सरकारची भूमिका ही कठोर असून कारवाईचे संकेत दिले. तसेच अशा अवैध खाणी बंद करण्याची घोषणा करत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले. तर तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

बावनकुळे यांनी, अवैध खाणकामावर कारवाई होणार असून याचा परिमाण वैध खाणींवर होणार नाही, त्या सुरूच राहतील. त्या सुरू ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर राज्यातील खाणकामाच्या स्थितीचा सखोल आढावा घेण्यासाठी सरकारकडून संपूर्ण राज्याचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागेल असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

याचबरोबर बावनकुळे यांनी रॉयल्टी बुडवणाऱ्यांना थेट इशारा देत अशा लोकांवर थेट कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. तर रॉयल्टी बुडवणाऱ्यांसह अवैध खाण मालकांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही वाचवले जाणार नाही. त्यांची गेल्या पाच वर्षांतील सर्व व्यवहारांची चौकशी केले जाईल असेही स्पष्ट केले आहे. तर याबाबत पुढील अधिवेशनापर्यंत श्वेतपत्रिका काढण्यात येईल अशीही घोषणा केली आहे.

Illegal Mining
Chandrashekhar Bawankule : व्यग्र वेळापत्रकातून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी, कुटुंबीयांचे केले सात्वंन...

FAQs :

1. अवैध खाणकामाचा मुद्दा का गाजला?
पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्यामुळे हा मुद्दा गंभीर झाला आहे.

2. सरकारने काय निर्णय घेतला आहे?
अवैध खाणी बंद करून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

3. कोणत्या भागांमध्ये कारवाई होणार आहे?
पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये.

4. कोणत्या मंत्र्यांनी ही घोषणा केली?
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे.

5. पुढे काय होऊ शकते?
जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर तातडीने कारवाई होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com