Child Marriages : नऊ महिन्यात 21 बालविवाह? आदिती तटकरेंना आकडे चुकीचे असल्याचा 'साक्षात्कार', 'ॲक्शन मोड'मध्ये येत म्हणाल्या...

Aaditi Tatkare's Raigad Child Marriage Crime : महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण वाढल्याचे समोर आले होते. येथे नऊ महिन्यांत तब्बल 21 बालविवाह प्रतिबंधक गुन्हे दाखल झाल्याचे उघड झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.
Aaditi Tatkare
Aaditi Tatkaresarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. 9 महिन्यात 21 बालविवाह प्रकरणांची माहिती समोर आली होती, मात्र आदिती तटकरे यांनी ती माहिती चुकीची असल्याचे सांगितले आणि हा आकडा प्रत्यक्षात 3 वर्षांचा असल्याचे स्पष्ट केले.

  2. महिला व बालविकास विभाग पूर्ण ताकदीने बालविवाह प्रथा हद्दपार करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

  3. आदिती तटकरे यांनी नागरिकांना 1098 चाईल्ड हेल्पलाइनद्वारे बालविवाह रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Raigad News : बालविवाह प्रथा आपल्या प्रगत व पुरोगामी महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी महिला व बालविकास विभाग पूर्ण ताकतीने प्रयत्न करत असतानाच रायगडमध्ये धक्कादायक माहिती समोर आली होती. ज्यात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याच रायगड जिल्ह्यात बालविवाह झाल्याचे समोर आले होते. तर नऊ महिन्यांत तब्बल 21 बालविवाह प्रतिबंधक गुन्हे दाखल झाल्याचेही उघड झाले होते. यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. यानंतर आता आदिती तटकरे यांनी सदर माहिती तथ्यहीन आणि जिल्ह्याची प्रतिमा मलिन करणारी असून हा आकडा 3 वर्षांचा असल्याचे म्हटलं आहे.

एकीकडे राज्यात बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाने मोहिम हाती घेत 1098 हा चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक सुरू केला. तसेच ग्रामस्तरावर ग्रामसेवकांना कायद्याचे प्रशिक्षणही दिले. मात्र महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याच जिल्ह्यात असे बालविवाह होत असल्याचे समोर आले. याचे आकडे समोर येत असताना जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये 14 ते 17 वयोगटातील मुलींचे विवाह सर्रास होत असल्याचेही चर्चा होती. यावरूनच महिला व बाल विकास मंत्र्यांच्याच जिल्ह्यात बालविवाह का थांबत नाहीत? असा सवाल आता उपस्थित केला जात होता.

यानंतर आता आदिती तटकरे यांनी आपल्या 'एक्स' या सोशल मिडियावरून यांची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये, बालविवाह प्रथा आपल्या प्रगत व पुरोगामी महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी महिला व बालविकास विभाग पूर्ण ताकतीने प्रयत्नशील आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून विभागाच्या वतीने 1098 हा चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला आहे.

Aaditi Tatkare
Raigad Crime : आदिती तटकरेंच्या बालेकिल्ल्यात बालविवाह वाढले? रायगडमध्ये अल्पवयीन मातांचं प्रमाण चिंताजनक, नऊ महिन्यात तब्बल 21 गुन्हे!

या हेल्पलाइनच्या माध्यमातून मागील 3 वर्षांत एकट्या रायगड जिल्ह्यात 21 बालविवाह रोखण्यात आपल्याला यश आले आहे. ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. तर ही सर्व प्रकरणे सन 2023-24 मध्ये 6, सन 2024-25 मध्ये 11, सन 2025-26 मध्ये 4 अशी आहेत. पण काही माध्यमांमध्ये याबाबत ही प्रकरणे मागिल 9 महिन्यात 21 बालविवाहांबाबत प्रकाशित केलेली आहे. जी तथ्यहीन व जिल्ह्याची प्रतिमा मलिन करणारी असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

तसेच, सार्वजनिक आरोग्य विभागासोबत समन्वय साधून सन 2025-26 दरम्यान आतापर्यंत अल्पवयीन मातांच्या 111 प्रकरणांमध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा व पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत महिला व बालविकास विभाग अत्यंत तत्पर असून बालविवाह किंवा अल्पवयीन मातांच्या प्रत्येक प्रकरणात कठोर कारवाई करण्यात येत आहे.

या प्रकरणांतील पीडित मुलींचे महिला व बालविकास विभागाच्या वतीने समुपदेशन करण्यात आले आहेत. आपल्या या लेकींना मानसिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाल संगोपन योजनेसह विविध शासकीय योजनांचा लाभही देण्यात येत असल्याचेही आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

बालविवाहाची प्रथा आपल्या लेकींना भूतकाळात ढकलणारी असून याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विभागाच्या वतीने सातत्यपूर्ण प्रक्रिया सुरू आहे. या आमच्या प्रयत्नांमध्ये आपणही सहभागी व्हावे. यासाठी आमच्या 1098 चाईल्ड हेल्पलाइनच्या माध्यमातून बालविवाह रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करत असल्याचेही आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

Aaditi Tatkare
Gogawale Vs Tatkare : रायगडमधील संघर्षात नवा ट्विस्ट! कार्यकर्ते हमरी-तुमरीवर, मात्र मंत्री भरत गोगावले आणि आदिती तटकरे मंचावर एकत्र

FAQs :

प्र.१: काही माध्यमांनी कोणती माहिती दिली होती?
👉 काही माध्यमांनी 9 महिन्यात 21 बालविवाह प्रकरणे नोंदवली असल्याचे वृत्त दिले होते.

प्र.२: आदिती तटकरे यांनी काय स्पष्ट केले?
👉 त्यांनी सांगितले की ही माहिती चुकीची असून, वास्तविक आकडेवारी ३ वर्षांची आहे.

प्र.३: बालविवाह प्रतिबंधासाठी कोणती हेल्पलाइन उपलब्ध आहे?
👉 1098 ही चाईल्ड हेल्पलाइन 24 तास कार्यरत आहे.

प्र.४: महिला व बालविकास विभागाची भूमिका काय आहे?
👉 हा विभाग बालविवाह प्रथा हद्दपार करण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी पूर्ण ताकदीने कार्यरत आहे.

प्र.५: आदिती तटकरे यांनी काय आवाहन केले?
👉 नागरिकांनी बालविवाहाच्या घटनांविरुद्ध तत्काळ 1098 वर संपर्क साधून प्रशासनाला सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com