NCP Vs Shivsena : तटकरेंच्या नेतृत्वावर शिंदेंच्या शिलेदाराचा पुन्हा हल्लाबोल; ‘त्यांनी आता मार्गदर्शनाच्या भूमिकेत यावं’, दळवींचा सल्ला

Raigad Politics : रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद काही केल्या कमी होताना दिसत नाही. आताही अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली आहे.
Mahayuti political dispute in Raigad; Sunil Tatkare and Mahendra Dalvi
Mahayuti political dispute in Raigad; Sunil Tatkare and Mahendra Dalvisarkarnama
Published on: 
Updated on: 

Raigad News : रायगडच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. “आमचा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर कोणताही वाद नाही; मात्र सुनील तटकरे यांचं नेतृत्व लोकांना मान्य नाही,” असं म्हणत दळवींनी तटकरेंना लक्ष्य केलं. तसेच, प्रत्येक वेळी युक्त्या करून स्वतःचं गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न थांबवावा आणि आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत यावं, असा सल्लाही त्यांनी दिला.

तटकरे यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत यावं; दळवींचा सल्ला

सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना महेंद्र दळवी म्हणाले की, तटकरेंनी आता प्रत्येक वेळी युक्त्या करून स्वतःला हवं ते साध्य करण्याचा प्रयत्न थांबवावा. त्यांचं वयही बऱ्यापैकी झालं असून, आता त्यांनी शांत राहून मार्गदर्शकाच्या भूमिकेत यावं. अशा पद्धतीने वारंवार राजकीय डावपेच आखून स्वतःचं इप्सित साध्य करणं जनतेच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे तटकरेंनी आता थांबावं आणि मार्गदर्शनाची भूमिका स्वीकारावी, असा सल्ला दळवींनी दिला.

रोह्यातील विकासकामावरून यापूर्वीही दळवींची टीका

काही दिवसांपूर्वी रोह्यातील मुस्लिमबहुल भागातील एका शाळेच्या दुरुस्तीच्या कामावरून महेंद्र दळवींनी सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती. या कामासाठी आपण निधी उपलब्ध करून दिला होता; मात्र खासदार तटकरे यांनी कामाचं उद्घाटन केलं आणि आपल्याला निमंत्रणही दिलं नाही, असा आरोप दळवींनी केला होता.

Mahayuti political dispute in Raigad; Sunil Tatkare and Mahendra Dalvi
Shivsena Vs NCP : महायुतीत पुन्हा वाकयुद्ध : तटकरेंचं दळवींना आव्हान, ‘सरोगसी बाळ’ फक्त शब्द लिहून दाखवा

विकासकामाचं उद्घाटन करताना संबंधित लोकप्रतिनिधींना निमंत्रित करणं अपेक्षित असताना आपल्याला आणि इतर संबंधितांना बोलावण्यात आलं नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. आपण निधी आणलेल्या कामाचं श्रेय तटकरे घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यावेळी दळवींनी तटकरेंना ‘सबुरीने घ्या’, असा सल्ला देत निर्णय घेण्याच्या घाईवरही टीका केली होती.

अनिकेत तटकरेंचा दळवींना इशारा

महेंद्र दळवी यांच्या टीकेनंतर आमदार अनिकेत तटकरे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. आमच्यावर वारंवार टीका केली, तर जशास तसं उत्तर देऊ, असा थेट इशारा अनिकेत तटकरे यांनी दिला होता. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदही यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आले होते.

Mahayuti political dispute in Raigad; Sunil Tatkare and Mahendra Dalvi
Shivsena Vs NCP : शिवसेना-राष्ट्रवादीचा वाद विकोपाला, तटकरेंच्या दाव्यावर दळवींवर पलटवार; 'राजकीय जन्माचा इतिहास विसरू नका'

रायगडमध्ये महायुतीतील संघर्ष पुन्हा चर्चेत

आता महेंद्र दळवींनी पुन्हा एकदा सुनील तटकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने रायगडमधील राजकीय संघर्षाला नव्याने तोंड फुटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट करतानाच तटकरे यांचं नेतृत्व लोकांना मान्य नसल्याचा दावा दळवींनी केला आहे. त्यामुळे महायुतीतील दोन्ही पक्षांमधील संबंध आणि रायगडच्या राजकारणातील पुढील घडामोडींकडे लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com