

कैलास म्हामले
Mangesh Kalokhe Murder : खोपोलीमधील मंगेश काळोखे यांच्या हत्येची घटना ही मानवतेला काळीमा फासणारी आहे. या प्रकरणात राजकारण न करता दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. पण यात सुधाकर घारे यांचे नाव राजकीय द्वेषाने आणले आहे, त्यांच्याबाबत झालेला प्रकार चुकीचा असून आहे, असा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यामागे उभा राहिला आहे.
मंगेश काळोखे हत्या प्रकरण आणि शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांची सोशल मीडियावर बदनामी होत असल्याचा दावा करत पक्षाच्या वतीने मंगळवारी (30 डिसेंबर) कर्जत येथील शिवालय पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी नितीन सावंत, पक्षाचे स्थानिक नेते बाबू घारे आणि माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत यांनी यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर टीका केली.
यावेळी बोलताना नितीन सावंत म्हणाले, मंगेश काळोखे यांच्या हत्येची घटना ही मानवतेला काळीमा फासणारी आहे. त्यांच्या हत्येनंतर मागील 4 दिवसांपासून आम्ही कोणतेही राजकारण न करता पीडित कुटुंबाच्या दु:खात सहभागी होण्याची भूमिका घेतली होती. मात्र काही लोकांनी या घटनेचा वापर करून राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सोशल मीडियावर आपल्याबद्दल उल्लेख करत बदनामी केली जात आहे.
पत्रकार परिषदेत पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे अशा घटना पुन्हा पुन्हा घडत असल्याचा आरोप करत, आम्हाला संयम घेण्यास पोलिस प्रशासन सांगत असताना अशा पद्धतीने बदनामी करणाऱ्यांना पोलिसांनी योग्य समाज द्यावी अन्यथा भविष्यात पोलिस ठाण्याविरोधात भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही नितीन सावंत यांनी दिला आहे. यावेळी सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन न्यायासाठी लढण्याचे आवाहन करण्यात आले
यावेळी बोलताना पंढरीनाथ राऊत बोलताना म्हणाले, मी 2009 मध्ये उपसभापती असताना त्यांच्याकडून माझ्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये मला 6 महिने घरी बसाव लागलं. तेव्हाही मी शिवसैनिक होतो ना? असा सवाल केला. तर बाबू घारे यांनी सुधाकर घारे यांच्याबाबत झालेला प्रकार चुकीचा आहे असे सांगत त्यांच्यासोबतचा अनुभव सांगितला. अशाच प्रकारे माझेही नाव एका खुनाच्या गुन्ह्यात आणले होते. पण चौकशीअंती 4 दिवसांत माझा संबंध नसल्याचे निष्पन्न झाले. सुधाकर घारे यांना सुद्धा न्याय मिळेल, असे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.