KDMC Election : उमेदवारीसाठी दिग्गजांच्या उड्या : कल्याण डोंबिवलीत पक्षांतराचा भडका; अखेरच्या क्षणी भाजप, मनसेचा आधार

KDMC Election News : केडीएमसी निवडणुकीत उमेदवारीसाठी शेवटच्या दिवशी पक्षांतरांचा भडका उडाला असून अपक्ष उमेदवारी आणि अंतर्गत नाराजीमुळे निवडणूक अधिक चुरशीची झाली आहे.
Leaders and candidates filing nomination forms at KDMC offices as last-minute party defections and independent entries intensify the Kalyan-Dombivli municipal election battle.
Leaders and candidates filing nomination forms at KDMC offices as last-minute party defections and independent entries intensify the Kalyan-Dombivli municipal election battle.Sarkarnama
Published on
Updated on

Kalyan Dombivli Municipal Corporation Election News : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वातावरण तापले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाकडून एबी फॉर्म मिळेल या आशेवर थांबलेले अनेक माजी लोकप्रतिनिधी आणि इच्छुक उमेदवार अखेर निराश झाले. परिणामी, उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी पक्षांतराचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपात, मनसेत अनेकांनी प्रवेश करत उमेदवारी अर्ज भरले आहेत. तर काहींनी थेट अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजप–शिवसेना शिंदे गटाने महायुतीची घोषणा करताच दोन्ही पक्षांतील इच्छुकांची अस्वस्थता वाढली. जागा वाटपात ‘कट’ होण्याची भीती आणि पॅनल पद्धतीमुळे तिकीटांची संख्या मर्यादित झाल्याने अंतर्गत नाराजी उफाळून आली. त्यातूनच पक्षांतर्गत हालचालींना वेग आला.

शिंदे सेनेतील जयंता पाटील यांनी भाजपातून उमेदवारी अर्ज भरत राजकीय वळण घेतले आहे. दुसरीकडे भाजपाचे माजी लोकप्रतिनिधी शैलेश धात्रक आणि मनिषा धात्रक यांनी मनसेत प्रवेश करून उमेदवारी अर्ज दाखल केला. मनसेचे प्रदीप चौधरी यांनी भाजपात प्रवेश करून पत्नीला मैदानात उतरवले, तर संदेश पाटील यांनी मनसेत प्रवेश करत स्वतःसह पत्नीकरिता उमेदवारी अर्ज भरला आहे.

Leaders and candidates filing nomination forms at KDMC offices as last-minute party defections and independent entries intensify the Kalyan-Dombivli municipal election battle.
Latur Political News : लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर,भाजपसाठी धोक्याची घंटा; काँग्रेसचा हातही झाला दुबळा!

या घडामोडींमुळे पक्षनिष्ठेपेक्षा ‘तिकीट हेच अंतिम ध्येय’ असल्याचे चित्र ठळक झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेसमधील (Congress) काही दिग्गजांनी भाजपात प्रवेश केला, तर भाजपातील नाराज शिंदे गटात गेले. त्याचवेळी शिंदे सेनेला धक्का देत आजदे गावचे माजी सरपंच व शिवसेनेचे विभाग प्रमुख जयंता दत्तू पाटील आणि त्यांची मुलगी काजल यांनी मनसेत प्रवेश करून पॅनल 19 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Leaders and candidates filing nomination forms at KDMC offices as last-minute party defections and independent entries intensify the Kalyan-Dombivli municipal election battle.
Nagpur Politics : ठाकरेंच्या पक्षाला एक जागा देणार नाही! काँग्रेस आमदाराच्या आक्रमक बाण्याने महाविकास आघाडीला अखेरच्या क्षणी सुरुंग!

दरम्यान, भाजप (BJP) आणि शिंदे गटाकडून एबी फॉर्म न मिळाल्याने काही इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. केडीएमसीच्या निवडणुकीत यंदा विकासापेक्षा राजकीय गणिते आणि पक्षांतरांचे वादळ अधिक चर्चेत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com