BJP Vs Shivsena : भाजप-शिवसेना युतीत पुन्हा ट्विस्ट : पुण्यात महायुतीचे जागावाटप 'सिक्रेट'; अर्ज मागे घेण्यापूर्वीच गेम फिरणार?

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीवर संभ्रम असून एबी फॉर्म वाटप ही सेनेची दबाव रणनीती मानली जात आहे, अंतिम निर्णय वरिष्ठ बैठकीनंतर अपेक्षित आहे.
Shiv Sena leaders distribute AB forms to candidates in Pune amid uncertainty over BJP–Shiv Sena alliance ahead of Pune Municipal Corporation elections.
Shiv Sena leaders distribute AB forms to candidates in Pune amid uncertainty over BJP–Shiv Sena alliance ahead of Pune Municipal Corporation elections.Sarkarnama
Published on
Updated on

BJP Vs Shivsena : पुण्यात भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने दोन्ही पक्षांनी सगळ्याच जागांवर एबी फॉर्म वाटप केले आहे. मात्र मुंबई-पुणेसह सर्व महापालिकांमध्ये महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी आम्ही एकदिलाने कार्यरत आहोत. कुठेही महायुती तुटलेली नसून मी अधिकृतपणे याची घोषणा करत आहे' असे शिवसेना नेते, मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच आतापर्यंत पुण्यात किती एबी फॉर्म भरले याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नसून तीन तारखेला चित्र स्पष्ट होईल असेही ते म्हणाले. त्यामुळे पुण्यात भाजप आणि शिवसेनेची युती तुटली की अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत चर्चा चालू राहणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी युती तुटल्याचा उच्चार करत सर्व जागा लढवणार असल्याचे सांगितले. शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनीही महायुती तुटल्याने स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. पण त्यानंतर माजी मंत्री विजय शिवतारे यांनी महायुती शाबूत असल्याचे सांगितले. शिवसेनेतील पदाधिकऱ्यांच्या परस्पर विरोधी वक्तव्याने भाजप शिवसेना युतीबाबत संभ्रम निर्माण झाला असताना सामंत यांनीही युती शाबूत असल्याचा पुनरुच्चार केला.

शिवसेनेच्या या दाव्यामागे आता वेगळीच रणनीती असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. जागा वाटपामध्ये भाजपाने शिवसेनेला अवघ्या 15 जागा सोडण्याची तयारी दाखवली होती. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष पाहायला मिळत होता. कुठेतरी हा रोष कमी करण्याच्या दृष्टिकोनातून एबी फॉर्म वाटप करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे शिवसेनेने सर्वांना AB फॉर्मवाटप केले असेल तरी अर्ज माघारी घेण्यावेळी वेगळच चित्र पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

Shiv Sena leaders distribute AB forms to candidates in Pune amid uncertainty over BJP–Shiv Sena alliance ahead of Pune Municipal Corporation elections.
NCP News: राष्ट्रवादीचा पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये चिन्हाचा प्रश्न मिटला : अजितदादांनी घड्याळ की तुतारी वादावर शोधला भन्नाट उपाय

उदय सामंत यांनीही "पुण्यात महायुतीचे जागावाटप 'सिक्रेट' आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चर्चेत अंतिम निर्णय होईल. उमेदवारी अर्ज माघारीच्या मुदतीच्या आत दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत महायुतीचे जागावाटपाचे सूत्र निश्चित होईल," असा दावा केला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांची बैठक होऊन निर्णय होणार आहे. या बैठकीत तोडगा निघेल अशी नेत्यांना अपेक्षा आहे.

Shiv Sena leaders distribute AB forms to candidates in Pune amid uncertainty over BJP–Shiv Sena alliance ahead of Pune Municipal Corporation elections.
Pune BJP news : चंद्रकांत पाटलांना नडलेल्या बालवडकरांना भाजपने उमेदवारी नाकारली : अखेरच्याक्षणी अजितदादांकडून उतरणार रिंगणात

दरम्यान शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी देखील युती तुटली नसल्याचे सांगितले आहे. एबी फॉर्म सर्वांना वाटले असले तरी पक्षाच्या वरिष्ठांनी निर्णय घेतल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार असल्याचे शिवतारे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकीकडे भाजपावर दबाव टाकणं आणि दुसरीकडे शिवसैनिकांमधील रोष कमी करण्यासाठी एबी फॉर्म वाटपाची सेनेची स्ट्रॅटर्जी असल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com