Thackeray Vs Shinde : शिंदे शिवसेनेचे अनेक आमदार ठाकरेंच्या संपर्कात; 'या' नेत्याचा मोठा दावा

Uddhav Thackeray and Eknath Shinde : शिवसेना ठाकरे गटही अॅक्टिव्ह मोडवर
Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray and Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg News : आगामी लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीच्याअनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यातच शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागला. यानंतर आता 'महायुती'कडून मेळाव्यांची तयारी करण्यात आली आहे. शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी (अजित पवार गट) व भाजप या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून पत्रकारपरिषदा सध्या सुरू आहेत.

दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटदेखील अॅक्टिव्ह मोडवर आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी विविध विषयांवर भाष्य करीत शिंदे गटावर जोरदार टीका केली. तसेच शिवसेनेच्या शिंदे गटाचे अनेक आमदार आजही उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत आणि ते परत येण्यास इच्छुक आहेत, असा मोठा गौप्यस्फोट नाईक यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंचा हिंदू जागर सुरूच; आधी हरिनाम, आता भागवत कथा सप्ताह

वैभव नाईक यांनी राणे यांच्यावरही जोरदार टीका केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीच्या झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख व आमदार नीतेश राणे हे एकत्र पत्रकारपरिषद घेतात, हा खरं तर बाळासाहेबांचा अपमान आहे. कारण ज्या राणेंनी गद्दारी केली, म्हणून बाळासाहेबांनी हाकलून दिलं होतं त्यांच्या मांडीला मांडी लावून जर हे बसत असतील तर बाळासाहेबांच्या विचारांचा हा अपमान आहे, अशी जोरदार टीका नाईक यांनी केली.

आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) आणि त्यांच्या वडिलांना आपण भाजपमध्ये का गेलो, हे माहिती आहे. अनेक चौकशा सुरू होत्या, त्यासाठी ते भाजपमध्ये गेले. याआधी काँग्रेसमध्येदेखील सर्व पदे त्यांनी भोगली आहेत. काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर ते भाजपात गेले आहेत, असा हल्लाबोल आमदार नाईक यांनी केला.

आज अनेक आमदार पुन्हा मागे येण्यासाठी तयार आहेत. मात्र, जे फिरायला गेलेत त्यांना फिरू द्या, अशी भूमिका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतली आहे. शिवसेना जरी फोडली तरी राज्यातील जनता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, हे भाजप ओळखून आहे. आज तुमच्याकडे 200 पेक्षा अधिक आमदार आणि 40 खासदारांपेक्षा अधिक आहेत. तरीही तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करावी लागते, यामधूनच ठाकरेंची लोकप्रियता दिसून येते, असेही आमदार वैभव नाईक म्हणाले.

(Edited By- Ganesh Thombare)

R...

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Jitendra Awhad Vs Ajit Pawar : जितेंद्र आव्हाडांना घेरण्यासाठी अजित पवार गटाची मोठी खेळी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com