

मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत वेबसाईटमध्ये काही तांत्रिक बदल सुरू असल्याची माहिती दिली आहे.
ई-केवायसी प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाचे कारण म्हणजे या सुधारणा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील काही महिलांसाठी स्वतंत्र पर्याय वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
Ladki Bahin Yojana News : राज्यातील महायुतीला दुसऱ्यांदा यश मिळवून दिलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सध्या गोंधळाचे वातावरण तयार झाले आह. या योजनेचे आतापर्यंत 15 हप्ते महिलांच्या खात्यावर देण्यात आले आहेत. पण अद्याप 16 वा हप्ता मिळालेला नाही. यावरून सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. तसेच ही योजना आता सरकार गुंडाळणार असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. यासाठी ई केवायसीचा घाट घातल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान 16 हप्ताही तटला आहे. यावरून राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले असून त्यांनी लाडक्या बहिणींना ई केवायसी करताना अडचणी येत असल्यानेच 16 वा हप्ता महिलांच्या खात्यावर वळता झाला नसल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत अनेक गोष्टी समोर येत असून आता ई केवायसीवरून देखील राज्यातील लाडक्या बहिणींना समस्या समोर येत आहेत. गेल्या महिन्याभरापासून ई केवायसी करताना मोठ्या अडचणींचा सामना लाडक्या बहिणींना करावा लागत आहे. सर्वर डाऊन, कधी ओटीपी न येणे या समस्यांसह ज्या लाडक्या बहिणी एकल माता, घटस्फोटीत महिला अथवा ज्या महिलांचे वडिल नाहीत अशांना ई केवायसी करता येत नव्हती.
या समस्यांमुळे अनेक महिलांची ई केवायसी थांबली असून त्यांना योजना मिळणार नसल्याची शक्यता निर्माण झाली होती. यावरून मंत्री अदिती तटकरे यांनी वेबसाईटमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे सध्या यावर काम सुरू असल्यानेच ई केवायसीला वेळ लागत असल्याचेही आता समोर आले असून अदिती तटकरे यांनी देखील हेच कारण असल्याचे म्हटले आहे.
अदिती तटकरे यांनी, लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये काही बदल केले जात आहेत. यामुळे ई केवायसी करण्यासाठी वेळ लागत आहे. ज्या महिलांचे पती आणि वडील नाहीत अशा महिलांसाठी वेबसाईटमध्ये बदल केले जात आहेत. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, त्यानंतर कोणतीही महिला लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही, असेही त्यांनी म्हटलं आहे.
सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांच्या आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता 10 ऑक्टोबरपर्यंत जमा झाला होता. दिवाळीपूर्वी हा हप्ता जमा होण्याच्या अपेक्षा होती मात्र अद्याप 16 वा हप्ता महिलांच्या खात्यावर वळता झालेला नाही. तर ई केवायसी करण्याची अंतिम मुदत तारीख 18 नोव्हेंबर 2025 आहे.
1. लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकरे यांनी काय सांगितलं?
त्या म्हणाल्या की, वेबसाईटवर काही बदल सुरू आहेत त्यामुळे ई-केवायसी प्रक्रियेस थोडा वेळ लागत आहे.
2. हे बदल कोणत्या महिलांसाठी केले जात आहेत?
ज्या महिलांचा पती आणि वडील नाहीत, अशांसाठी वेबसाईटवर नवीन सुविधा उपलब्ध होणार आहेत.
3. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होण्यास किती वेळ लागेल?
तटकरे यांनी सांगितले की, ही प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल.
4. ही योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
ही योजना महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आहे.
5. लाडकी बहीण योजनेचा उद्देश काय आहे?
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवण्यासाठी ही योजना राबवण्यात येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.