Yogesh Kadam : वार-प्रतिवार सुरू असतानाच योगेश कदमांचा ठाकरेंना दणका, काका सदानंद कदमांचाच कट्टर समर्थक फोडला

Yogesh Kadam Vs Sadanand Kadam : तळकोकणात सध्या ठाकरे आणि रामदास कदम यांच्यात सुरू असणाऱ्या वाक युद्धावरून राजकारण चांगलेच तापलेलं आहे. अशातच राज्यमंत्री योगेश कदम यांनी ठाकरे यांना पुन्हा एकदा दणका दिला आहे.
uddhav thackeray And Yogesh Kadam
uddhav thackeray And Yogesh Kadamsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. दापोली मतदारसंघात आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी राज्यमंत्री योगेश कदमांनी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.

  2. त्यांनी दोन महत्त्वाचे स्थानिक नेते शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश घडवून आणले, ज्यामुळे राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ झाली आहे.

  3. या प्रवेशामुळे दापोलीतील निवडणूक लढतीत शिंदे गटाला बळ आणि ठाकरे गटाला फटका बसल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

Ratnagiri News : तळकोकणासह मुंबईतील राजकीय वातावरण हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतेचे नेते रामदार कदम यांच्या आरोपांमुळे चांगलेच तापलं आहे. त्यांनी थेट हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस कशासाठी उद्धव ठाकरेंनी घरात ठेवला. त्यांच्या हातांचे ठसे का घेतले असा सवाल करत राजकीय वातावरण तापवले. यानंतर आता दोन्ही शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच आता राज्यमंत्री योगेश कदम यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा दणका दिला आहे. त्यांनी दापोली मतदारसंघातील शिवसेनेसह काका सदानंद कदमांचाच कट्टर समर्थक फोडला आहे. यामुळे स्थानिकच्याआधीच दापोलीत राजकीय समिकरणं बदलणार आहेत.

जिल्ह्यासह दापोली मतदारसंघात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागल्याचे समोर येत आहे. तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाचा नेता राजन तेली नुकताच शिवसेनेच्या गळाला लागला. यानंतर आता योगेश कदम यांनी देखील पहिला झटका काका सदानंद कदम यांना दिला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्योगपती सदाआप्पा कदम हे रामदास कदम यांचे बंधू असून ते त्यांचे कट्टर विरोधक मानले जातात. तळकोकणातील दापोली खेड मतदारसंघात यांच्यातील राजकीय वैमनस्य हे सर्वज्ञात आहे. अशातच दोन वेळा पंचायत समिती सदस्य राहिलेल्या योगिता बांद्रे आणि प्रकाश सकपाळ हे त्यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांचाच शिवसेना पक्षप्रवेश घडवून घेत योगेश कदम यांनी मोठी खेळी केली आहे.

uddhav thackeray And Yogesh Kadam
Yogesh Kadam : देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेल्या मदतीवर शिवसेनेचे मंत्री योगेश कदमच नाराज!

याच्याआधी अमरीश हेदुकर हे शिवसेनेत दाखल झाले होते. आता सदानंद कदम यांचे दुसरे सहकारी प्रकाश सपकाळही शिवसेना दाखल झाले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे गटाला नामोहरम करण्याची राजकीय रणनीती आखल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

अनिल परबांशी द्वंद

ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी दापोली नगरपंचायत निवडणुकीत मोठी खेळी करत रामदास कदम यांना शह देण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आणि सत्ता परिवर्तन झाले. यानंतर राज्यात महायुतीचे सरकार आले आणि शिवसेनेचे दापोलितील नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले. त्यापाठोपाठ नगराध्यक्षही शिवसेनेचा करून योगेश कदम यांनी आपल्या अपमानाचा बदला घेतल्याचे बोलले जात होते.

योगेश कदम यांनी ठाकरेंची जिल्ह्यातील रदस थांबवत माजी आमदार संजयराव कदम, विधानसभा निवडणूक लढवलेले माजी पंचायत समिती सभापती किशोर देसाई यांनाही फोडत शिवसेनेत आणले. दरम्यान आता फोडलेले माजी आमदार, नगरसेवक, माजी पंचायत समिती सदस्य यांच्या प्रवेशाने शिवसेनेवर कोणता परिणाम होईल हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीत समोर येईल.

मात्र हे पक्षप्रवेश होत असले तरी आता याचा नेमका कोणता परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक व दीड वर्षांनी होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकांमध्ये कसा व कितपत पडतो हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे. सत्ता परिवर्तनाच्या या पटावर दाखल झालेले काही नगरसेवक व आता प्रवेश होत असलेले कार्यकर्ते त्यांची आगामी निवडणुकांमध्ये कशी कामगिरी राहते व त्याचा नेमका कोणता फायदा शिवसेनेला व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना होतो हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे.

uddhav thackeray And Yogesh Kadam
Yogesh Kadam: कदम कुटुंबाला 'तोडपाणी गँग' म्हणत अनिल परबांचा इशारा; म्हणाले, टप्प्याटप्प्यानं बाहेर...

FAQs :

प्रश्न 1: दापोलीत योगेश कदमांनी कोणते प्रवेश घडवून आणले?
👉 त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतील दोन स्थानिक नेते शिंदे गटात आणले आहेत.

प्रश्न 2: या प्रवेशांचा उद्देश काय आहे?
👉 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे गटाची ताकद वाढवणे हा हेतू आहे.

प्रश्न 3: या हालचालीचा ठाकरे गटावर काय परिणाम झाला?
👉 ठाकरे गटाच्या स्थानिक संघटनांवर परिणाम होण्याची शक्यता असून, मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

प्रश्न 4: दापोली मतदारसंघाचे राजकीय महत्त्व काय आहे?
👉 हा कोकणातील रणनीतिक मतदारसंघ आहे आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा निकाल राज्यस्तरीय समीकरणांवर प्रभाव टाकतो.

प्रश्न 5: या प्रकरणावर योगेश कदमांनी काय प्रतिक्रिया दिली?
👉 त्यांनी म्हटले की, “शिंदेसेना वाढवण्यासाठी लोक स्वयंस्फूर्तीने येत आहेत, हे विकासाच्या राजकारणाचं यश आहे.”

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com