क्षीरसागरांचा चकवा कोणाला? : शिवसेनेत असूनही कार्यक्रमाला शिंदे-फडणवीसांना बोलावले!

कधीकाळी क्षीरसागरांच्या कार्यक्रमात पुढच्या खुर्चीवर असणाऱ्या पंकजा मुंडेंऐवजी देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमाला आता आमदार सुरेश धसांची हजेरी.
Jayadat Kshirsagar-Eknath Shinde-Devendra Fadnavis
Jayadat Kshirsagar-Eknath Shinde-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) असताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांनी भूमिपुजनाला तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) निमंत्रण दिले होते. आता शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असताना भूमिपूजनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बोलविले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सध्या ते असलेली शिवसेना, शिंदेंची शिवसेना व भाजपच्या स्थानिक नेत्यांना दूर ठेवले, त्यामुळे जयदत्त क्षीरसागरांचा ‘चकवा’ आता नेमका कोणाला, असा प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे. (Shiv Sena's Jaydatta Kshirsagar invited Eknath Shinde-Devendra Fadnavis to Bhumi Pujan program)

रस्त्यांमुळे बीडचे ‘चिखलबीड’ झाले असताना क्षीरसागर काका-पुतण्यांमध्ये श्रेयवाद आणि आरोप-प्रत्यारोपांचे ‘ॲटमबॉम्ब’ रोजच सुरु आहेत. या रस्त्यांची कामे मंजूर होऊन आणि निधी मिळून चार महिने लोटून गेली आहेत. एकदा स्थानिक आमदार म्हणून संदीप क्षीरसागर यांनी यातील अनेक कामांची भूमिपूजनेही उरकली. मात्र, प्रस्ताव जयदत्त क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सादर करुन तत्कालिन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावाही केल्याने त्याची भूमिपूजने शिंदेंच्या हस्ते होणार म्हणून कामे बंद होती.

Jayadat Kshirsagar-Eknath Shinde-Devendra Fadnavis
भास्कर जाधव चिपळूण-गुहागरमधून निवडून कसे येतात?, तेच आता बघू : दरेकरांचे चॅलेंज

अखेर गुरुवारी (ता. २० ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतून दूरदृश्यप्रणालीद्वारे या कामांची सुरुवात करण्यात आली. मुंबईत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर उपस्थित होते. मात्र, क्षीरसागर सध्या ते असलेल्या शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले होते. कधीकाळी क्षीरसागरांच्या कार्यक्रमात पुढच्या खुर्चीवर असणाऱ्या पंकजा मुंडेंऐवजी देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमाला आता आमदार सुरेश धसांची हजेरी यामुळे क्षीरसागर नेमका कोणाला ‘चकवा’ देत आहेत, याची चर्चा सुरु आहे.

Jayadat Kshirsagar-Eknath Shinde-Devendra Fadnavis
MCA Election : नार्वेकरांनी घेतली दुसऱ्या क्रमांकाची मते; विजयानंतर उद्धव ठाकरेंचा फोन

मागच्या काही काळापासून त्यांच्या गळ्यातून निघून पडलेला शिवसेनेचा भगवा यामुळे त्यांच्याकडून नव्या राजकीय वाटेचा शोध सुरुय हे लपून नाही. गळ्यातील भगवा व शिवसेना चिन्ह बाजूला सारण्यामागे निकटवर्तीय जरी पालिका राजकारणाचे कारण देत असले तरी ही विकास कामे तत्कालिन महाविकास आघाडी सरकारच्या काळातच मंजूर झालेली होती. विशेष म्हणजे जयदत्त क्षीरसागर सध्या असलेल्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होते. त्यांच्या हस्तेही ते भूमिपूजनही करू शकले असते. मात्र, त्यांची घुसमट आघाडी सरकार आल्यापासूनच सुरु असल्याने ते सर्वच बाबतीत ‘सुरक्षित अंतर’ आणि ‘योग्य वेळेची’ वाट पाहत आहेत. म्हणून या कामांसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बीडमध्ये येऊ शकले नाहीत, तरी दूरदृश्य प्रणालीने त्यांनी कामे सुरु करुन घेणेच सगळे काही सांगून जाते.

Jayadat Kshirsagar-Eknath Shinde-Devendra Fadnavis
दौंडकरांसाठी मोठी बातमी : तीन हंगामानंतर भीमा-पाटस कारखाना सुरू होणार!

राष्ट्रवादीत असताना जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागरांनी लोकसभेला भाजपचा प्रचार करुन शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले होते. आता मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेत असताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बोलविले. रस्त्यांच्या भूमिपुजनाच्या निमित्ताने त्यांनी नवी राजकीय वाटचाल सुरु असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र, त्यांचा नवा पक्ष आणि मुहूर्ताची सामान्यांना वाट पाहवी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com