Raj Thackeray : राज ठाकरेंना कोकणातील डॅमेज कंट्रोलची शेवटची संधी? खेडेकरांनी मागणीतली भेटीची वेळ

Vaibhav Khedekar MNS : सध्या कोकणात विरोधातील राजकीय पक्षांना गळती लागली आहे. विशेष: रत्नागिरी जिल्ह्यात. याआधी ठाकरे गटाला येथे गळती लागली होती. ती अद्याप थांबलेली नसतानाच आता मनसे समोर पक्षातील खदखद चिंतेचा विषय बनला आहे.
Raj Thackeray And former Khed municipal head Vaibhav Khedekar, Uday Samant, Ramdas Kadam And yogesh Kadam
Raj Thackeray And former Khed municipal head Vaibhav Khedekar, Uday Samant, Ramdas Kadam And yogesh Kadamsarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : कोकणात विरोधी पक्षांना एकीकडे गळती लागली असतानाच याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील अपवाद राहिलेली नाही. रत्नागिरीही कोकणात मनसेचे जाळे तयार करणारा शिलेदार माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर राज ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत आहे. यामुळे मनसेला कोकणात मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. अशा चर्चा सुरू असतानाच खेडेकर यांनी राज ठाकरेंकडे भेटीची वेळ मागितल्याचे समोर आले आहे. यामुळे राज ठाकरे खेडेकर यांची समजूत काढतात का? त्यांची खदखद दूर करतात का ते पाहावं लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या दणदणीत विजयानंतर आता टार्गेट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यासाठी मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. यायाच पार्श्वभूमीवर कोकणात मोठ्या प्रमाणात राजकीय भूकंप घडवून आणले जातातय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह शेकाप आणि मनसेमधील नाराजांसाठी रेड कार्पेट हातरले जात आहे. अशातच कोकणातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय कोकणातील बुलंद तोफ व आक्रमक नेते वैभव खेडेकर मनसे सोडण्याची तयारीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत नाराजी ही व्यक्त केली होती. त्यांनी, 'निष्ठवंतांना पक्षात कवडीचीही किंमत नसते'असं व्हाटस अप स्टेटस ठेवलं होतं. यानंतर कोकणात राजकारण चांगलंच ढवळून निघालं होतं. यानंतर आता खेडेकर यांनी, आपण पक्ष सोडणार नसल्याचे सांगत या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.

Raj Thackeray And former Khed municipal head Vaibhav Khedekar, Uday Samant, Ramdas Kadam And yogesh Kadam
Raj Thackeray News : घुमजाव करण्याचा डाव तर नाही ना? राज ठाकरेंचे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना खरमरीत पत्र...

तसेच त्यांनी, कोकणात आपल्यासह मनसेच्या कार्यकार्यांना पक्षात योग्य मान सन्मान मिळत नाही. पक्षात सतत अपमानास्पद वागणूक देत असल्याची खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. तसेच त्यांनी, माझ्यासह येथील कार्यकत्यांचे राज ठाकरे यांच्यावर अजूनही विश्वास असून ते आमचे ऐकून घेतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

Raj Thackeray And former Khed municipal head Vaibhav Khedekar, Uday Samant, Ramdas Kadam And yogesh Kadam
Raj Thackeray Pune Visit : 'मनसे'अध्यक्ष राज ठाकरे येणार पुण्यात ; युतीच्या चर्चांना फुलस्टॉप अन् स्वबळाची घोषणा होणार?

एकीकडे राज ठाकरेंवर खेडेकर यांनी विश्वास दाखवताना दुसरीकडे त्यांनी, शिवाजी पार्क मित्र मंडळाकडून आपल्याबाबत चुकीची माहिती पूरवली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर खेडेकर यांनी राज ठाकरे यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. पण अद्याप त्यांना वेळ मिळालेली नाही. यामुळे जिल्ह्यात राज ठाकरे खेडेकर यांचे ऐकूण घेवून काय निर्णय घेतात? जर वेळच नाकारण्यात आली तर खेडेकर पुढचा कोणता निर्णय घेतात? याकडे जिल्ह्यासह कोकणातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com