Dnyaneshwar Mhatre : विजयी गुलालात रंगलेल्या चोरट्याचा आमदार म्हात्रेंच्याच खिशावर डल्ला

MLC Election : जल्लोष करताना काळजी घेण्याचं केलं आवाहन
Dnyaneshwar Mhatre
Dnyaneshwar MhatreSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : राज्यभरात गुरुवारी (ता. २) विधान परिषद निवडणुकीचा (MLC Election) धुरळा उडाला. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा दणदणीत विजय झाला. त्यावेळी त्यांच्यासह समर्थकांनी विजयाचा जल्लोष साजरा केला.

या जल्लोषातील जोशाचा नेमका एका चोरट्यानं फायदा घेत चक्क आमदारालाच धक्का दिला. विजयाच्या गुलालात रंगलेल्या एका चोरट्यानं आमदार म्हात्रे यांच्या खिशावर डल्ला मारत ७५ हजार लंपास केल्यांच समोर आलंय.

कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी नवी मुंबईत पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना धक्का देत महायुतीचे ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांचा विजय झाला.

त्यांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्राबाहेर म्हात्रे यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. याच जल्लोषाच्या गुलालातच रंगलेल्या अज्ञात चोरट्याने म्हात्रे यांच्या खिशातून तब्बल ७५ हजार रुपये चोरल्याची घटना घडलीय. (Political Crime News)

Dnyaneshwar Mhatre
Old Pension Scheme : विजय होताच जुन्या पेन्शन योजनेबाबत ज्ञानेश्वर म्हात्रेंचे मोठे विधान; म्हणाले...

ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) हे विजयी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर मोठा जल्लोष केला. यावेळी म्हात्रे यांना आलिंगन देण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतलं असता, त्यांच्या समोरच्या खिशातील ५० हजार तर मागील खिशात असलेले २५ हजार रुपये चोरट्यांनी चोरले.

Dnyaneshwar Mhatre
Konkan MLC Election Result: विजयानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे आहेत कुठे?

आपल्या खिशातील पैसे गायब झाल्याचे म्हात्रे यांच्या लागेच लक्षात आले, मात्र चोरटा समर्थकांच्या गर्दीत मिसळला होता. या प्रकारानंतर म्हात्रे यांनी मतमोजणी केंद्रावर असलेल्या पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनीही शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला मात्र काही उपयोग झाला नाही.

दरम्यान घडलेल्या प्रकाराबाबत म्हात्रे यांनी आज माहिती दिली. सोबतच अशा गर्दीच्या ठिकाणी आणि जल्लोषात सहभागी होताना यापुढे सर्वांनीच काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे.

Dnyaneshwar Mhatre
Maharashtra Politics : शिवसेनेतून आलेल्या ज्ञानेश्वर म्हात्रेंनी भाजपला तारलं; अन्यथा...

कोकण शिक्षक मतदारसंघात (Kokan Teacher Constituency) शेकापचे बाळाराम पाटील (Balaram Patil) आणि भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात थेट लढत झाली. यात म्हात्रे यांना २० हजार ८०० मिळाली, तर पाटील यांना ९ हजार ५०० मते मिळाली. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी ११ हजार ३०० मताधिक्य घेत विजयी झाल आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com