BMC elections : मुंबईत राजकीय युद्ध! नितेश राणेंची ठाकरेंवर तिखट टीका; 'बुरखेवाली, सुपारी' म्हणत...

Nitesh Rane sharp attack on Uddhav Thackeray : मुंबईच्या महापौरपदावरून राजकीय वातावरण तापलं असून मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार असा ठाम विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
BMC elections; Nitesh Rane And Uddhav Thackeray
BMC elections; Nitesh Rane And Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापौर पदावरून राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे.

  2. भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटावर तीव्र टीका केली आहे.

  3. “मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच असावा” या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

BJP vs Shivsena UBT News : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंबरोबर युती करत मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. तर यावरून भाजपने ठाकरे बंधुंवर जोरदार टीका केली आहे. त्यातच भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांनी उत्तर भारतीय महापौराबाबत वक्तव्य करून वादाची वात पेटवून दिली आहे. आता या वादात भाजप मंत्री नितेश राणे यांनी उडी घेतली असून उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केलीय. त्यांनी, उत्तर भारतीय महापौराची जेवढी मिरची म्हणत ठाकरेंनी डिवचलं आहे.

राज्यात एकीकडे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचा धुरळा उडाला असतानाच मुंबईत मराठी आणि हिंदूत्वावरून भाजप आणि शिवसेनेत जोरदार जुंपली आहे. अशातच कृपाशंकर सिंग यांनी उत्तर भारतीय महापौराचा मुद्दा उपस्थित करत वादाला नवे तोंड फोडले आहे.

त्यांनी, मिरा-भाईंदर येथे बोलताना, जास्तीत जास्त उत्तर भारतीय नगरसेवक निवडून आणण्याचे आवाहन केले. तर उत्तर भारतीय महापौर होण्यासाठी हे गरजेचं असल्याचेही ते म्हणाले. यानंतरच भाजपवर शिवसेना नेत्यांनी टीकेची झोड उठवली.

BMC elections; Nitesh Rane And Uddhav Thackeray
BMC Election update : ठाकरेंना भिडणाऱ्या किरीट सोमय्यांच्या लेकाचा विजय निश्चित? सेना-मनसेचा उमेदवारच नाही, महत्वाची अपडेट

शिवसेनेनं भाजप मराठीविरोधी असल्याची टीका केली. यावरूनच आता नितेश राणे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला असून याबाबत एक ट्वीट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये, जितकी मिर्ची ठाकरे गटाला... उत्तर भारतीय महापौरची लागली... तितकी मिर्ची बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही, असा सवाल केला आहे.

तसेच ठाकरेंनी फक्त हिंदुंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतलेली दिसते असाही आरोप त्यांनी केला आहे. मुंबईच्या अस्मितेची आणि हिंदूत्वाचा मुद्दा लावून धरताना, मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदूच होणार आणि तो आमचाच असेल असा विश्वासही यावेळी नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

BMC elections; Nitesh Rane And Uddhav Thackeray
BMC Election : मुंबईत महायुतीला मोठा झटका; निवडणुकीआधीच दोन जागा हातून गेल्या?

FAQs :

1. मुंबई महापौर पदावरून वाद का निर्माण झाला आहे?
मुंबई महापालिका निवडणूक जवळ आल्याने महापौर पदावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे.

2. नितेश राणेंनी कोणावर टीका केली आहे?
नितेश राणेंनी शिवसेना ठाकरे गट आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

3. नितेश राणेंच्या वक्तव्याचा मुख्य मुद्दा काय आहे?
मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच असावा, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

4. या वक्तव्याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
या वक्तव्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

5. ही बाब कोणत्या निवडणुकीशी संबंधित आहे?
ही संपूर्ण घटना मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीशी संबंधित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com