Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात मोठा धक्का, महत्वाचा बडा नेता लागला भाजपच्या गळाला

Shivsena UBT Crisis : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे याच्या शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. ही गळती अद्याप थांबलेली नाही. यामुळे स्थानिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची मोठी परीक्षा असणार आहे.
Uddhav Thackeray Shivsena UBT Crisis
Uddhav Thackeray Shivsena UBT Crisis sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. रायगड जिल्हा संपर्कप्रमुखाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिला आहे.

  2. त्यांनी उद्या भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून हा प्रवेश पक्षासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

  3. या गळतीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या गटासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

Raigad News : काहीच महिन्यांवर आता महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा कधीही होवू शकते. आचारसंहीता कधीही लागू शकते. यामुळे राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणीला वेग आला असून मोठ्या प्रमाणात पक्षांतरेही पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात असे पक्षांतरेही होत असून यामुळे महायुती डॅमेज होताना दिसत होती. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रंगलेल्या वादाच्या दरम्यान मात्र भाजपने बचावात्मक पवित्रा घेत आपला मोर्चा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे वळवला आहे. भाजपने येथे महत्वाचा नेता गळाला लावला असून यामुळे आगामी स्थानिकच्या आधीच ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

जिल्‍ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती अद्याप थांबायचे नाव घेत नसून आता भाजपने लक्ष केलं आहे. आगामी स्थानिकच्या तोंडावर नागेंद्र राठोड यांनी रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदाचा तडकाफडकी राजीनामा देत ठाकरेंचे शिवबंधून तोडले. तर ते आता भाजपच्‍या गळाला लागल्याची चर्चा असून ते मंगळवारी (28 ऑक्‍टोबर) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांचा पक्षप्रवेश प्रदेशाध्‍यक्ष रविंद्र चव्‍हाण यांच्‍या उपस्थितीत होणार आहे.

दरम्यान आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधी राठोड यांचा पक्षप्रवेश भाजपसाठी महत्वाचा ठरणार आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून राठोड यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात होते. तर नेमका ते कोणता राजकीय निर्णय घेतात. कोणत्या पक्षात प्रवेश करतात याकडे सर्वांचं लक्ष होतं.

Uddhav Thackeray Shivsena UBT Crisis
Shivsena UBT Crisis : तळकोकणात ठाकरेंची शिवसेना संकटात! ‘आऊट गोईंग’ही वाढले, नेत्यांचा भाजप-शिंदे गटाकडे ओढा

गळती अजूनही थांबलेली नाही

मागच्यावर्षी लोकसभेनंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होताच महाविकास आघाडीला गळती लागली आहे. मविआतील ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग झाले आहे. ज्यात सर्वाधिक फटका हा ठाकरेंच्या शिवसेनेला बसला आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम करत अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. आताही हा सिलसिला सुरू असल्याने आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासमोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे.

Uddhav Thackeray Shivsena UBT Crisis
Shivsena UBT Crisis : राजीनामा देताच 'मातोश्रीला' खडबडून जाग; ठाकरेंकडून घोसाळकरांच्या मनधरणीचे प्रयत्न

FAQs :

1. नागेंद्र राठोड कोण आहेत?
ते रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख आणि ठाकरेंच्या गटातील महत्त्वाचे नेते होते.

2. त्यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला आहे?
नागेंद्र राठोड यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

3. त्यांनी शिवसेना सोडण्याचे कारण काय दिले आहे?
स्थानिक पातळीवरील राजकीय मतभेद आणि भविष्याच्या संधींचा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

4. हा प्रवेश भाजपसाठी किती महत्त्वाचा आहे?
राठोड हे रायगडमधील प्रभावशाली नेते असल्याने भाजपसाठी हा प्रवेश रणनीतिक दृष्ट्या महत्त्वाचा ठरेल.

5. या गळतीचा उद्धव ठाकरेंच्या पक्षावर काय परिणाम होऊ शकतो?
रायगडसारख्या जिल्ह्यात शिवसेनेचा पक्षसंघटन कमजोर होण्याची शक्यता आहे, ज्याचा निवडणुकांवर थेट परिणाम होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com