

Ratnagiri/Nagpur News : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मिडियावर पैशांच्या गड्ड्यांसह आमदार महेंद्र दळवी बसल्याचा व्हिडिओ शेयर केला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया देताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केले आहेत. तसेच त्यांनी यावेळी अधिवेशन काळात विधीमंडळात मंत्र्याच्या गैर हजेरीवरून देखील सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
नागपूर येथे राज्याच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी मोठा राजकीय बॉम्ब टाकला. त्यांनी,सकाळीच ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी नोटांची बंडल घेवून बसल्याचे दिसत आहेत. त्यावरून आता एकच खळबळ उडाली आहे. अशातच आता भास्कर जाधव यांनी विधीमंडळात पत्रकारांशी संवाद साधताना कॅश बॉम्ब आणि मंत्र्यांच्या उपस्थितीवरून सरकारलं घेरलं आहे.
त्यांनी, राज्याच्या इतिहासात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसा वाटण्यात आला असून याआधी असे कधीच झाले नाही. तर सत्ताधारी पक्षाच्याच लोकांनी सत्ताधारी पक्षाच्याच नेत्यांच्याकडे कसे पैसे आले होते त्याचाच चित्रपट संपूर्ण महाराष्ट्राला दाखवला. एक मंत्रीतर टॉवेल हातात सिगार आणि बाजूला पैशांनी भरलेल्या बॅगा घेऊन बसले होते. मंत्री हेलिकॉप्टरमधून पैशाच्या बॅगा उतरवून त्या ढकलत जातानाही समोर आले होते. तर त्या कपड्याच्या होत्या असं सांगण्यात आलं.
आता तर सत्ताधारी पक्षातलेच एक आमदार व्हिडिओ गेम खेळण्यासाठी पैशाचे बॅगांच्या बॅगा आणि नोटांचे पुडके घेवून बसले आहेत. याचा अर्थ असाच की महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा पैसा आलाय? सत्ताधारी पक्षांच्याकडे तो आलाय. त्यामुळे आता देशाचे पंतप्रधानांनाच एक विनंती वजा प्रश्न विचारावासा वाटतो की नोटाबंदीचा निर्णय नेमका कशासाठी घेतला. जर खरचं कॅशलेस भारत करायचा होता. तर तुमच्याच सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्याकडे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये कॅश येते कोठून?
जर कालाधन काढण्याकरता म्हणून तुम्ही नोटाबंदी केलीत. हा काळा बाहेर काढण्याकरता "मोनोटायझेशन" म्हणून नोटाबंदी करण्याचा निर्णय घेतला तर मग राज्यात ह्या नोटा आल्या कोठून? याचे उत्तर आता देशाच्या प्रमुखांसह राज्याच्या प्रमुखांनी देण्याची गरज आहे. तर ज्यावेळी दोन हजार आणि हजारांची नोट बंद केली, त्याच वेळेला देशामध्ये काही लोकांना संशय आला होता की नोट बंदी कर करण्याचं फक्त नाटक केलं जाईल आणि प्रत्यक्षपणे या देशांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हा पैसा बाहेर येईल आणि तो आता यायला लागला आहे.
कोण मंत्री गैरहजर?
यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर देखील टीका करताना, ते काय बोलतात हेच त्यांना कळत नाही. त्यांना कुठल्याही प्रकारचा विधी निषेध राहिलेला नाही किंवा कोणाची भीती, सामाजिक बांधिलकी राहिलेली नाही. यावेळी त्यांनी, दादाजी भुसे, उदय सामंत आणि शंभूराज देसाई विधीमंडळाच्या कामकाजावेळी गैरहजर राहिल्यावरून देखील खेडबोल सुनावले. यावेळी त्यांनी जर यासाठी मुख्यमंत्री आणि अध्यक्ष महोदयांनी तशी सूट दिली असेल तर ठीक पण विधीमंडळाच्या परंपरेला दुसऱ्या मंत्र्यायाने तिसऱ्याच मंत्र्याच्या कारभाराबाबत उत्तर देण्याची गरज नाही, पण आपल्याकडे कोणीही उठून उत्तर दिली जात आहेत. हे योग्य नाही त्यामुळे सर्व मंत्र्यांना विधीमंडळात हजर राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
अध्यक्ष राहुल नार्वेकर काय म्हणाले?
यावरून अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेला मुद्दा महत्वाचा आहे. एखादा प्रश्नाचे उत्तर संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी उत्तर देणे अपेक्षित आहे. पण संविधानात दिलेल्या तरतुदीनुसार आपल्या सगळ्यांना सामूहिक जबाबदारीची संकल्पनेची कल्पना आहे. तसं असल्यामुळे नियमानुसार इतर मंत्र्यांना उत्तर देण्यापासून मी काय थांबू शकणार नाही, असे उत्तर दिले आहे. तसेच उत्तर येताना ते काही एक्सटेम्पो नसते. त्या संदर्भातला आधी ब्रिफिंग घेतली जाते. त्यानंतरच जबाबदारी पूर्वक उत्तर दिली जातात. त्यामुळे तसे आदेश देता येणार नाही, असेही त्यांनी नार्वेकर यांनी म्हटले आहे. यावरून पुन्हा प्रश्न करणाऱ्या विजय वडेट्टीवारांना त्यांनी गप्प करत बोलण्याची संधीही दिली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.