Narayan Rane News: खासदार राणेंची शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'वाऱ्यानं घरं,बिल्डिंगही पडते...'

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्यावरुन राजकारण करणार्‍यांना खडेबोल सुनावले आहे. पुतळा घटना दुर्दैवी आहे.राणे म्हणाले,जे विरोधक आता पुतळ्याबाबत बोलत आहेत, त्यांनी आठ महिन्यांत पुतळा कसा झाला आहे हे बघितलं का ?
Narayan Rane News
Narayan Rane NewsSarkarnama
Published on
Updated on

Kokan News : कोकणातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय नौदलाने उभारलेला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या पुतळा अवघ्या आठ महिन्यांतच कोसळल्याचा प्रकार सोमवारी(ता.26) घडली.

या घटनेमुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरोधात संतप्त पडसाद उमटत आहे. विरोधकांनीही पुतळा कोसळल्याचा मुद्दा उचलून धरत सरकारवर घणाघाती टीका केली आहे. आता या घटनेवर खासदार आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्यावरुन राजकारण करणार्‍यांना खडेबोल सुनावले आहे. पुतळा घटना दुर्दैवी आहे.राणे म्हणाले,जे विरोधक आता पुतळ्याबाबत बोलत आहेत, त्यांनी आठ महिन्यांत पुतळा कसा झाला आहे हे बघितलं का ? त्याला एखादा हार घातला का ? कालचा वार्‍याचा वेग बघा काय होता. या वाऱ्यानं घरं पडतात, बिल्डिंगही पडते असंही ते म्हणाले.

नारायण राणे यांनी यावेळी पीडब्ल्यूडीचे ऑफिस फोडल्यावरुन ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्यावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, काल एक आमदार बांधकाम विभागाचं ऑफिस फोडण्यासाठी गेला. पण गेला तो ऑफिस बंद झाल्यावर आणि मिरवतो की, मी निष्ठावान आमदार आहे. हा निष्ठावान आमदार सकाळी मातोश्री आणि संध्याकाळी एकनाथ शिंदे यांच्याकडे असतो.आमदार झाल्यापासून कळलं नाही का, की तिथं जाऊन पुतळा पाहावा असा टोलाही त्यांनी यावेळी आमदार नाईकांना लगावला.

Narayan Rane News
Anandrao Adsul: खासदारकी अन् राज्यपालपदासाठी पत्ता कट; अडसूळ आता विधानसभेला ताकद लावणार

राणे म्हणाले, या सगळ्यांना मी उघडं करीन. बंदशिवाय यांना काय येतं? मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारी माणसं आहेत. राहुल गांधींबाबत तर काय बोलावं.त्यांचा धर्म कोणता आहे हेच कळत नाही. काँग्रेस सगळ्या क्षेत्रात बदनाम आहे. त्यांना बोलण्याचा अधिकार नाही.

मात्र, या प्रकरणाची चौकशी केली जाईल.उद्या मी दुपारी 12 वाजता घटनास्थळी जाणार आहे आणि दुपारी पत्रकार परिषद घेणार असल्याचेही नारायण राणे यावेळी सांगितले.याचवेळी त्यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यावरही थोडक्यात भाष्य केले.केसरकर जे बोलले, त्याच्याशी मी सहमत नाही.मी त्यांना बोलेन असंही ते म्हणाले.

Narayan Rane News
Congress Politics: भाजपने भ्रष्टाचारासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडले नाही, याची खंत!

केसरकरांचं वादग्रस्त विधान...

मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत असतानाच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अकलेचे तारे तोडले आहेत.

केसरकरांनी मंगळवारी (ता.27) घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला हा अपघात आहे, असे वादग्रस्त विधान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे नौदलाने घाईघाईने काम केले, अशी कबुलीही केसरकरांनी केली.

ते म्हणाले, पुतळा बनवताना काही तांत्रिक त्रुटी दूर केल्या नसल्यामुळे हा अपघात झाला असावा, ही एक संधी आहे. अरबी समुद्रात शिवाजी महाराज यांचा ज्या प्रमाणे पुतळा उभारण्यात येणार आहे. तसाच पुतळा येथे उभारला तर देशासाठी चांगली बाब ठरेल. काही तरी चांगले करण्याची ही संधी आहे. या मंत्री केसरकरांच्या विधानानंतर समाजाच्या सर्वच स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

Narayan Rane News
Vishwajeet Kadam on Rahul Gandhi : '...म्हणून राहुल गांधी येत आहेत सांगलीत', विश्वजीत कदमांनी सांगितलं कारण!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com